‘वी आर डाउन बट नॉट आऊट’, विजय संकल्प मेळाव्यातून फडणवीसांनी लावला विरोधकांना टोला

‘वी आर डाउन बट नॉट आऊट’, विजय संकल्प मेळाव्यातून फडणवीसांनी लावला विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून (BJP) आज मुंबईमध्ये भाजपा विजय संकल्प मेळावा (BJP Vijay Sankalp Melawa) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठी माणसाने मतदान केलं नाही. त्यांना एका विशिष्ट समाजाने मतदान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी गेल्या चार- पाच महिन्यांपासून हिंदू भगिनींनो आणि मातांनो बोलायचं सोडले होते अशी टीका या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईत महायुतीला (Mahayuti) महाविकास आघाडीपेक्षा (MVA) 2 लाखांपेक्षा जास्त मतदान मिळाला आहे. हिंदूह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नाव ज्यांच्यासाठी ठाकरेंनी जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतो त्यांनी त्यांना मतदान केले असेही फडणवीस म्हणाले.

संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या तितके जागा फक्त भाजपला मिळाले आहे. फेक नॅरेटिव्हमुळे काही जागांवर आपल्याला नुकसान झाले आहे. या फेक नॅरेटिव्हला आपल्याला सोशल मीडियावर उत्तर देता आलं नाही त्यामुळे आपण काही जागांवर पराभव झालो मात्र फेक नॅरेटिव्ह एकद्याच चालतो पुन्हा पुन्हा चालणार नाही वी आर बाउन्स बॅक. येस महाराष्ट्रात वी आर डाउन बट नॉटआऊट असं देखील फडणवीस म्हणाले.

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही मुंबईत मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकणार आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही जिंकणार. मुंबईच्या महापालिकेवर आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली परिस्थिती मान्सून सारखी आहे. जिथे पाऊस पाहिजे होता तिथे कमी झाला आणि ओडिसामध्ये जास्त पाऊस झालं. देशात चार राज्यात अपेक्षापेक्षा वेगळा निकाल आला आहे. जर या राज्यात अपेक्षाप्रमाणे निकाल आला असता तर छात्या बडवणाऱ्यानी आज वेगळ्या प्रकारे छात्या बडवल्या असत्या असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लावला.

शेअर मार्केट घोटाळा! शेवगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज