Stock Market Today: जागतिक बाजाराच्या कमकुवत ट्रेंडमुळे भारतीय शेअर बाजार (Indian stock market) बुधवारी (१७ जानेवारीला) घसरणीसह उघडला. आ सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) आणि निफ्टी (NSE Nifty) मध्ये मोठी घसरण झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी घसरला आणि 72000 च्या खाली गेला. तर निफ्टी 21650 च्या खाली उघडला. यानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या, भाजपचा हल्लाबोल
आजच्या व्यवहारात शेअर बाजारात विक्रीचा बोलबाला राहिला. शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दुपारी 3 वाजता सेन्सेक्स 1,619.05 अंकांनी (2.21%) घसरला आणि 71,509.72 च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, या काळात निफ्टी 461.45 अंकांनी (2.09%) घसरला आणि 21,570.85 च्या पातळीवर पोहोचला. त्यामुळं गुंतवणूकदारांना 4.5 लाख कोंटीचा फटका बसला.
तर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 1,371.23 अंकांनी घसरून 71,757.54 अंकांवर आणि निफ्टी 395.35 अंकांनी घसरून 21,636.95 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, सकाळी 9.17 च्या सुमारास, सेन्सेक्स 755.28 अंकांनी म्हणजे 1.03 टक्क्यांनी घसरून 72,373.49 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 203.50 अंकांनी म्हणजे, 0.92 टक्क्यांनी घसरून 21,828.80 वर व्यवहार करताना दिसला.
कोणत्या शेअर्सला फायदा ?
आजच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात भारती एअरटेल, इन्फोसिस, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, आयटीसी निफ्टी समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली, तर एचडीएफसी बँक, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि बजाज ऑटो यांना मोठा तोटा सहन करावा लागला.
एचडीएफसीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले
तिमाही निकालानंतर (Q3 Result) आज HDFC बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून 1,580.00 रुपये झाले.
यासोबतच अॅक्सिस बँक, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर्सही तोट्यात होते. या घसरणीमुळे, निफ्टी बँक सुरुवातीच्या व्यवहारात 1,202.4 अंकांनी किंवा 2.50% च्या तोट्यासह व्यवहार करत होती. इतर क्षेत्रांबद्दल बोललो तर भांडवली वस्तू आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स नफ्यासह व्यवहार करत आहेत.
दरम्यान, काल बीएसई सेन्सेक्स 30 शेअर्सवर आधारित 199.17 अंकांच्या किंवा 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह 73,128.77 अंकांवर बंद झाला. तर NSE निफ्टी 65.15 अंक किंवा 0.29 टक्क्यांच्या घसरणीसह 22,032.30 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,085.72 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.