Tata Cars Discount Offers : जर तुम्ही देखील जुलै महिन्यात तुमच्यासाठी नवीन कार (New Car) खरेदी करण्याचा तयारी करत असला तर तुमच्यासाठी देशाची सर्वात मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असणारी टाटा मोटर्सने (Tata Motors) एक शानदार डिस्काउंट ऑफर (Discount Offers) जाहीर केला आहे.
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता बंपर बचतसह तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करू शकता. टाटाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात कंपनी काही लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनसचा फायदा घेता येणार आहे. चला मग जाणून घेऊया कोणत्या कार्सवर टाटा किती डिस्काउंट ऑफर देत आहे.
Tata Tiago
कंपनी आपल्या या लोकप्रिय हॅचबॅक कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर तब्बल 35 हजारांची सूट देत आहे. तर सीएनजी व्हेरियंट ग्राहकांना 25 हजारांची सूट मिळत आहे. याच बरोबर कंपनीकडून या दोन्ही व्हेरियंटवर 20 हजार रुपयांचे एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनस देखील देत आहे.
Tata Tigor
तर Tata Tigor च्या पेट्रोल व्हेरियंटवर ग्राहकांना 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही ही कार जुलै महिन्यात खरेदी केली तर तुम्हाला 55,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. याच बरोबर कंपनी या कारच्या सीएनजी व्हेरियंटवर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट देत आहे.
Tata Altroz
शानदार फीचर्ससह येणारी Tata Altroz वर देखील कंपनीकडून जुलै महिन्यात डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. ग्राहकांना या कारच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 25 हजारांची सूट कंपनीकडून देण्यात येत आहे. तर 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट सूट मिळत आहे. ज्यामुळे जुलै महिन्यात या कारवर तब्बल 50 हजार रुपयांची बचत होणार आहे. तर सीएनजी व्हेरियंटवर ग्राहकांना 15 हजार रुपयांची रोख सवलत आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस तसेच 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
Tata Nexon
देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी टाटाची लोकप्रिय कार Tata Nexon वर देखील ग्राहकांना बंपर सूट मिळत आहे. जुलै महिन्यात Tata Nexon वर 25 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामध्ये 20 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटवर 5 हजारांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
Video : वानखेडे तयार! टीम इंडियासाठी मरीन ड्राईव्हवर मुंबईकरांची गर्दी, पहा व्हिडिओ
Tata Harrier आणि Tata Safari
तर Tata Harrier आणि Tata Safari वर जुलै महिन्यात 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट कंपनीकडून देण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जुलै महिन्यात बंपर बचत होऊ शकते.