TMC Recruitment 2024 : वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या (Job)शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बामती आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना मुंबईत (Mumbai)चांगल्या पगाराची नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे नुकतीच टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) मुंबई येथे अपघाती वैद्यकीय अधिकारी (Casualty Medical Officer) पदासाठी भरती होत आहे. दरम्यान, या पद भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? पात्रता काय आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.
Avneet Kaur :अवनीत कौरने दुबईमध्ये लुटला सुट्टीचा आनंद…
पद आणि पदसंख्या –
टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अपघाती वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती करण्यात येणार आङे. परंतु, या पदासाठी किती जागांवर भरती होणार आहे, याबद्दल कोणताही आकडेवारी अधिसूचनेत नमूद केलेली नाही.
शैक्षणिक पात्रता-
अपघाती वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले असणे अपेक्षित आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारांनी अधिक माहितीसताठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा –
अपघात वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्षे आहे.
“मला ऊर्जा ईश्वर देतो, परमात्म्यानेच मला पाठवलं”; PM मोदींच्या वक्तव्याची चर्चा तर होणारच..!
पगार
टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अपघात वैद्यकीय अधिकारी या पदावर निवड झाल्यानंतर, उमेदवाराला प्रति महिना रु 84,000/- वेतन दिले जाईल.
टाटा मेमोरियल सेंटरची अधिकृत वेबसाइट लिंक –
https://tmc.gov.in/index.php/en/
अधिसूचना लिंक –
https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28972
किंवा
https://tmc.gov.in/m_events/Upload/17052024_8/OS-TMH-34-2024%20%20CASUALTY%20MEDICAL%20OFFICER.pdf
अर्ज आणि अर्ज प्रक्रिया-
अपघात वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारे केली जाईल. यासाठी उमेदवारांना मुलाखतीच्या दिवशी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे लागेल.
मुलाखतीला उपस्थित राहण्याचा पत्ता –
एचआरडी विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई- 400012.
मुलाखत दिनाकं – 27 मे 2024
उमेदवारांनी सोबत ठेवायची कागदपत्रे-
स्वतःचा अपडेट केलेला रेझ्युम
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्डची प्रत
पॅन कार्डची प्रत
सर्व शैक्षणिक आणि अनुभव प्रमाणपत्रे
उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीला हजर राहणे बंधनकारक आहे. या पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू 27 मे 2024 रोजी होणार आहे. मुलाखतीची वेळ सकाळी 9.30 ते 10.30 अशी आहे.