TISS नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

TISS नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

TISS Mumbai Bharti 2024 : आज अनेकजण नोकरीच्या (job) शोधात आहे. तुम्ही देखील उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्से (Tata Institute of Social Sciences) ने नुकतीच एक भरतीची अधिसूचना जारी केली. या भरतीअंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.

मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरण बदललं; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याठी भरती सुरू केली आहे. 16 मे पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, पदांनुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवार tiss.edu या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील –
पार्टनरशिप मॅनेजर पदे – 2 पदे.
स्पेशलिस्ट रिसर्च आणि डेटा ॲनालिसिस – 1 पद
वरिष्ठ संवाद सहयोगी – 2 पदे.

अर्ज कसा करायचा?
पात्र उमेदवारांनी https://bit.ly/CETE-TISS-ApplicationNTS-May2024 अर्ज भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट केल्यानंर स्क्रीनशॉट घेऊन तो cete.recruitment@tiss.edu या मेलवर पाठवायचा आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, राज्यात 13 जागांसाठी मतदान, ‘या’ दिग्गजांच भवितव्य पणाला 

तुम्हाला पोस्ट संदर्भात काही प्रश्न असल्यास तुम्हीvijay.jathore@tiss.edu, mahesh.ghule@tiss.edu आणि sudheer.reddy@tiss.edu वर ईमेल करू शकता.

अर्ज सबमिट करताना उमेदवारांनी ईमेलच्या विषयामध्ये पोस्टचे नाव लिहावे.

लिखित/वैयक्तिक संभाषण कौशल्यांसाठी उमेदवारांना ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 मे 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2024 आहे. निवड झाल्यानंतर, उमेदवारांची वॉक-इन-मुलाखत होईल.

मुलाखत कधी होईल?
5 ते 20 जून 2024 दरम्यान उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते.
निवडलेल्या उमेदवारांना 15 दिवसांच्या आत TISS, मुंबई येथे रूजू व्हावे लागले.

अधिसूचना-

https://tiss.ac.in/uploads/files/CETE_Advt_Non-teaching_Multiple_Positions_16_may_2024_Final.pdf

अधिकृत वेबसाइट लिंक – tiss.edu

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज