Download App

भारतीयांना इंटरनेटचं वेड! दिवसातले पावणे सात तास ऑनलाइन; रिपोर्टमधून खुलासा

भारतीयांना इंटरनेटची प्रचंड सवय झाली आहे. एका रिपोर्ट नुसार भारतीय लोक दिवसातील साधारण 6.45 तास ऑनलाइन असतात.

Internet Users in India : इंटरनेट आणि मोबाईल शिवाय तुम्ही तुम्ही राहू शकता का.. या प्रश्नाचं उत्तर नाहीच असं मिळेल. तुम्हीच काय तर कोट्यावधी भारतीयांची हीच परिस्थिती आहे. कोणतेही काम असो इंटरनेट आणि मोबाईल शिवाय पूर्ण होतच नाही. भारतीयांना इंटरनेटची प्रचंड सवय झाली आहे. एका रिपोर्ट नुसार भारतीय लोक दिवसातील साधारण 6.45 तास ऑनलाइन असतात.

मोबाईल फोन आणि इंटरनेट या दोन गोष्टींचे व्यसन अनेकांना जडले आहे. यामध्ये भारतीय नागरिकांचा वाटा मोठा आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय लोक दिवसातील साधारण पावणे सात तास ऑनलाइन असतात. तर जगातील अन्य देशांतील युजर्स दिवसातील 6 तास 40 मिनिटे ऑनलाईन असतात. म्हणजेच भारतीय लोक याबाबतीत आघाडीवर आहेत. इतकेच नाही तर ॲप डाऊनलोड करण्याच्या बाबतीतही भारतीयांनी दुसरा नंबर पटकावला आहे.

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जारी केलेल्या करन्सी अँड फायनान्स रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की मागील वर्षात भारतीयांनी तब्बल 2600 कोटी वेळा ॲप डाऊनलोड केले आहेत. भारत टेलिकॉम आणि इंटरनेट युजर्सच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मोदी- मेलोनींचा फोटो पुन्हा चर्चेत; 8 फोटो ज्यांनी इंटरनेटचं ट्रॅफिक वाढवलं

मोबाइल डाऊनलोड स्पीड 82 पट वाढला

मागील काही वर्षांत सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड 82 पटींनी वाढला आहे. सन 2014 मध्ये मोबाइल डाऊनलोड स्पीड 1.3 एमबीपीएस होता आता हाच स्पीड 107 एमबीपीएस झाला आहे. याच दरम्यान 5 जी टेक्नॉलॉजीने (5G Technology) एन्ट्री घेतली आहे त्यामुळे डाऊनलोड स्पीड (Download Speed) आणखी वाढला आहे. भारत आता त्या देशांच्या यादीत आला आहे ज्या देशांच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा डिजिटली कनेक्टेड आहे.

मोबाईलच्या मदतीने देशभरातील कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन नेटवर्क आणि इंटरनेटशी जोडलेले डिव्हाईस यामागे आहेत. या व्यतिरिक्त भारतात डाटा स्टोअरेज आणि कम्प्युटिंगची सहज उपलब्धता ही देखील कारणे यामागे आहेत. भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूंची मागणीही जास्त आहे. जगातील विकसित देश आणि मोठ्या कंपन्या आजही भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच पाहतात.

Jio Down : मोठी बातमी! जिओ डाउन, हजारो लोकांचे इंटरनेट बंद

युपीआय युजर्सच्या संख्येत वाढ

इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता (Smartphones) वापर यांमुळे डिजिटल पेमेंटमध्ये अलीकडच्या (Digital Payment) काळात वाढ झाली आहे. देशात जवळपास 42.1 कोटी युनिक युजर्स आहेत जे युपीआय पेमेंटचा वापर (UPI Payment) करत आहेत. तर तब्बल 138 कोटी लोक आधारकार्ड धारक आहेत. भारतात 116.5 कोटी लोकांकडे फोन आहेत. यातील 75 कोटी लोक स्मार्टफोनधारक आहेत तर 95.4 कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांची संख्या 46.7 कोटी आहे. यामध्ये असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे एक पेक्षा जास्त फोन आणि सोशल मीडिया अकाऊंट आहेत.

follow us