मोदी- मेलोनींचा फोटो पुन्हा चर्चेत; 8 फोटो ज्यांनी इंटरनेटचं ट्रॅफिक वाढवलं

  • Written By: Published:
1 / 8

इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान पुन्हा एकदा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेल्फीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.

2 / 8

मोदी आणि मेलोनी यांचा हा खास सेल्फीनं काही वेळातचं इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, याआधीदेखील मेलोनी आणि मोदींचे फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले होते.

3 / 8

यापूर्वी या दोघांच्या कोणत्या फोटोंनी इंटरनेटवरचं ट्रॅफिक वाढलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत.

4 / 8

इंटलीतील बैठकीसाठी गेलेले मोदी आणि जॉर्जिया यांचे अनेक फोटो समोर आले आहे. त्यांच्या या फोटोंवर इंटरनेटवर दोन्ही नेत्यांशी संबंधित मीम्सचा महापूर आला आहे.

5 / 8

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मेलोनी यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच मेलनी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पीएम मोदींसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

6 / 8

गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेत आणि त्यानंतर दुबईतील COP 28 मध्ये हे दोन्ही नेते भेटले होते.

7 / 8

त्यानंतर दोन नेत्यांमधील मैत्रीबाबत ऑनलाइन मीम्सचा पूर आला होता. यशिवाय गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही दुबईतील 28 व्या COP28 दरम्यान दोन्ही नेत्यांनी सेल्फी घेतला होता.

8 / 8

तसेच एक फोटो शेअर करत मेलोनी यांनी याला "COP28 मधील चांगले मित्र, मेलोडी" असे कॅप्शन दिले होते. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर "मेलडी" हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज