Download App

Thane Mahanapalika : परिचारिका पदांच्या 100 जागांसाठी भरती सुरू, परिक्षेचं टेन्शन नाही, थेट मुलाखत

  • Written By: Last Updated:

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं. मात्र, जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल तर ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) तुमच्यासाठी नोकरीची चांगली संधी संधी उपलब्ध झाली आहे. परिचारिका (Nurse) पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पालिकेने नवीन भरती जाहीर केली आहे.

PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. ठाणे महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि मुलाखतीचा पत्ता याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव – परिचारिका

एकूण रिक्त पदे- 100

शैक्षणिक पात्रता –

1. महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालंता प्रमाणपत्र परिक्षा (एचएससी)
2. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदवीका (जी.एन.एम)
3. बीएससी (नर्सिंग) असल्यास प्राधान्य
4. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलची नोंदणी आवश्यक
5. किमान तीन वर्षाचा अनुभव
6. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष
मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष

शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.

आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय 

नोकरीचे ठिकाण – ठाणे

मुलाखत सुरू होईल – 22 नोव्हेंबर 2023 सकाळी 11 वाजता

मुलाखतीची कधी संपेल – 22 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 वाजता

मुलाखतीचे ठिकाण –

कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,

स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत,

सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

अधिकृत वेबसाइट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

आवश्यक कागदपत्रे

शालेय परीक्षेचे प्रमाणपत्र, नावात बदल असेल तर राजपत्र, डोमेसाईल, लहान कुटुंबाचा दाखला, दोन पासपोर्ट फोटो, वयाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी, गुन्हा नसल्याचे हमीपपत्र

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1vi_KC5GIUW20DuScEt_tWBWBhcuZQv3J/view

follow us