आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय
मुंबई : रेशन दुकानावर धान्यासोबतच आता साडीही मोफत मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी पुढील पाच वर्षे दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला एक साडी मोफत मिळणार आहे. अंत्योदय अर्थात पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांची संख्या 24 लाख 58 हजार 747 इतकी आहे. (Along with grains, sarees will also be available free of cost at the ration shops)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी ही योजना निश्चित करण्यात आली आहे. तर राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासन देणार आहे. एक साडी 355 रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे.
Hasan Mushrif : ..तर आम्ही मंत्रिपदाचे राजीनामे देऊ; राऊतांविरोधात मुश्रीफ मैदानात
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा :
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना रेशनकार्डधारकांना गणपती, दिवाळी अशा सणांमध्ये गतवर्षीपासून आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. यंदाही दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. यंदाच्यावर्षी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ 100 रूपयांना देण्यात येत आहे.
Manoj Jarange : ‘श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांसमोर दाखवू नका, तुमची मस्ती’.. सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जरांगेंचा संताप
शासनाने नुकत्याच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल या चार गोष्टींचा समावेश असलेला आनंदाचा शिधा रेशनकार्डवरुन ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये या दराने दिला होता. आता यंदाच्या दिवाळीतही आनंदाचा शिधा देत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चिंतेत असलेल्या नागरिकांची दिवाळी सरकारने गोड केली आहे.