Download App

युनियन बॅंकेत 600 हून अधिक पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अर्ज

  • Written By: Last Updated:

Union Bank of India Recruitment 2024 : आज अनेक जण नोकरीच्या शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. मात्र, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत. ती म्हणजे, युनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नुकतीत एक बंपर भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ (‘Specialist Officer’) पदांसाठी भरती सुरू आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी आहे.

‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.unionbankofindia.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, येत्या मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाऊ शकते.या पदासाठी अर्ज करायला फारच थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळं या पदभरतीसाठी उमेदवारांना तातडीने अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त पदांचा तपशील:
स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी ६०६ रिक्त जागांसाठी भरती जाहिर केली जाईल.

अर्ज फी:
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु. 175 आणि सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी रु. 850 रुपये अर्ज फी असणार आहे.

‘आदिवासी असल्यानं मला टार्गेट केलं’; हेमंत सोरेन यांनी फ्लोर टेस्टमध्ये खेळलं आदिवासी कार्ड 

निवड प्रक्रिया:
अर्ज आणि पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा, अर्ज स्क्रिनिंग किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असणार आहे.

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम http://www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर होम पेजवर रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा.

यानंतर युनियन बँक रिक्रूटमेंट प्रोजेक्ट २०२४-२०२५ स्पेशलिस्ट ऑफिसर्ससाठी या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर अप्लाय करण्यासाठी नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर ओप झालेल्या अर्जात तुमचे तपशील भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर शुल्काचा पर्याय असेल.
फी भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट देखील तुमच्यासोबत

महत्वाची बाब अशी की, उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले किंवा चुकीचे माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळं अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

 

follow us

वेब स्टोरीज