UPI Payment : आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात UPI व्यवहार होताना दिसत आहे. UPI च्या मदतीने लोक घरी बसून शॉपिन्ग, जेवण्याची ऑर्डर तसेच इतर आर्थिक व्यवहार काही मिनिटांमध्ये करत आहे. या लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI वेळोवेळी UPI पेमेंटमध्ये बदल करत असते. ज्याचा फायदा लाखो लोकांना होतो. यातच आता पुन्हा एकदा NPCI कडून UPI पेमेंटमध्ये काही बदल केले आहे.
नवीन बदलानुसार आता बँक खाते नसतानाही पेमेंट करता येणार आहे. मात्र याचा लाभ सर्वांना मिळणार नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत UPI पोहोचवा यासाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता बँक खाते नसलेल्या लोकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. हे सर्व बदल डिजिटल इंडिया बॅनरखाली करण्यात येत आहे.
तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्यास तुम्ही UPI वापरू शकतात. UPI पेमेंट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे ॲप वापरू शकता आणि बँक खात्याशिवाय पेमेंट करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही कुटुंबातील सदस्याच्या खात्यातून पेमेंट करू शकता. त्याला ‘डेलीगेट पेमेंट सिस्टम’ असे नाव देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या कुटुंबातील एका सदस्याचे बँक खाते असल्यास, इतर कोणताही वापरकर्ता देखील ते वापरू शकतो. विशेष म्हणजे तो स्वत:च्या मोबाईलवरून अक्टिव्ह UPI वापरू शकतो.
बचत खात्यावर सुविधा उपलब्ध होणार
माहितीनुसार, सध्या ही सुविधा फक्त बचत खात्यावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज खात्यांवर दिली जाणार नाही आणि ज्या व्यक्तीकडे मुख्य बँक खाते असेल तो ते पूर्णपणे नियंत्रित करू शकतो. याच बरोबर तो UPI वापरण्यासाठी कोणालाही परवानगी देऊ शकतो.
‘लाडका भाचा स्पर्धा परिक्षा योजना’ सुरु करा, MPSC व IBPS परिक्षांवरून अतुल लोंढे सरकारवर भडकले
परवानगी मिळाल्यानंतर, वापरकर्ते केवळ त्यांच्या मोबाइलवर UPI पेमेंट मोड वापरू शकतील. ही सर्विस सुरु झाल्यानंतर UPI पेमेंटमध्ये वाढ होऊ शकते अशी NPCI ला आशा आहे. ही सर्विस लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते मात्र तरीही सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित राहू शकते अशी देखील चर्चा सुरु आहे.