UPI पेमेंटवर चार्ज लागणार की नाही? NPCI ने दिले स्पष्टीकरण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 29T164857.135

UPI Payment Charge :  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) युपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर चार्ज करण्याच्या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. एनपीसीआयने यूपीआय पेमेंटवर चार्ज लावला जाणार या माहितीचे खंडन केले आहे. एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याला कोणताही चार्ज लागणार नसल्याचे एनपीसीआयने सांगितले आहे. देशातील सर्वाधिक 99.9 टक्के युपीआय ट्रँजेक्शन हे बँक अकाउंटच्या माध्यमातूनच केले जाते.

एनपीसीआयने आपल्या स्पष्टीकरणामध्ये याची सविस्तर माहिती दिली आहे. युपीआयच्या माध्यमातून पेमेंट केल्यास बँक किंवा कस्टमर यांच्यापैकी कुणालाही चार्ज लागणार नाही. याचबरोबर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत युपीआय ट्रँजेक्शन केल्यास त्यालाही कोणता चार्ज द्यावा लागणार नाही. एनपीसीआयने सांगितले की रेग्युलेटरी गाइडलाईन्सनुसार प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट ( PPI Wallets ) आता इंटरऑपरेबल युपीआय इकोसिस्टीमचा हिस्सा आहे. त्यामुळे एनपीसीआयने पीपीआय वॉलेट्सला इंटरऑपरेबल युपीआय इकोसिस्टीमचा भाग होण्यास परवानगी दिली आहे.

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठा धक्का; व्यवहारांवर द्यावे लागणार चार्जेस

 

त्यामुळे इंटरचेंज चार्ज केवळ पीपीआय मर्चेंट ट्रँजेक्शनवरच लागू होणार आहे. यासाठी कस्टमरला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एनपीसीआयने जारी केलेल्या सर्क्युलरनुसार गूगलपे, पेटीएम, फोनपे किंवा दुसऱ्या अॅपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर 1.1 टक्के इंचरचेंज चार्ज द्यावा लागेल. पेटीएमने देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे.

एका बँकेतून दुसऱ्या बँकेत युपीआय ट्रँजेक्शन केल्यास त्याला देखील कोणत्याही स्वरुपाचा चार्ज द्यावा लागणार नाही, असे एनपीसीआयने आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटले आहे. यासह कस्टमरकडे युपीआय आधारित बँक अकाउंट, रुपे क्रेडिट कार्ड, प्रीपेड वॉलेट्सचा इ. ऑपशन असू शकते.

Tags

follow us