Using smartphones at a young age is dangerous for children; Shocking information revealed in report : एका नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वय वर्षे 13 आधी स्मार्टफोनचा वापर (Smartphone Use) करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा जास्त असते. या संशोधनात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यानंतर संशोधनाचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत.
बीड हादरल! हॉटेलमध्ये बसलेल्या युवकाच्या डोक्यात सपासप वार, तरुणाला जाग्यावरच संपवलं
मानसिक आरोग्य धोक्यात
अहवालानुसार, लवकर स्मार्टफोन वापरामुळे (Smartphone Use) 12 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 18 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये आत्महत्येचे विचार, जास्त आक्रमकता, वास्तवापासून दूर जाणे, भावनांवर नियंत्रण नसणे आणि कमी आत्मसन्मान यांसारख्या समस्या सामान्यतः आढळून येत असल्याचे समोर आले आहे. संशोधनात असेही दिसून आले आहे की, या मानसिक आरोग्याच्या समस्यांमागे सोशल मीडियाच्या लवकर संपर्कात येण्यामुळे (Smartphone Use) होणारी सायबरबुलिंग, कमी झोप आणि तणावपूर्ण कौटुंबिक संबंध ही प्रमुख कारणे आहेत.
HDFC Bank चे नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार; जाणून घ्या सर्वकाही नाहीतर…
तज्ञांचा इशारा आणि कारवाईची मागणी
जगातील सर्वात मोठा मानसिक आरोग्य डेटाबेस असलेल्या ग्लोबल माइंड प्रोजेक्ट ‘सेपियन लॅब्स’ने हा अभ्यास केला आहे. या संस्थेच्या मुख्य न्यूरोसायंटिस्ट डॉ. तारा त्यागराजन म्हणतात की, लहान वयात स्मार्टफोन वापरणे (Smartphone Use) आणि सोशल मीडियाचा वापर करणे याचा मेंदूच्या विकासावर खोलवर परिणाम होतो.
डॉ. तारा त्यागराजन यांच्या मते, मेंदूच्या विकासावर होणारा परिणाम केवळ नैराश्य आणि चिंता यांपुरता मर्यादित नाही तर हिंसक प्रवृत्ती, वास्तवापासून दूर जाणे आणि आत्महत्येचे विचार यांसारख्या गंभीर परिस्थितींमध्ये देखील बदलू शकतो. ही परिस्थिती समाजासाठीही धोकादायक ठरू शकते.
वक्तव्यांवर संयम ठेवा! मंत्री विखे पाटलांचा मनोज जरांगेंना सल्ला…
मुली आणि मुलांवर वेगवेगळे परिणाम
अभ्यासातून समोर आले आहे की, लहान वयात स्मार्टफोन वापरण्याचा (Smartphone Use) परिणाम मुली आणि मुलांवर वेगवेगळ्या पद्धतीने दिसुन आला. मुलींमध्ये स्वतःची प्रतिमा खराब होणे, आत्मविश्वासाचा अभाव आणि भावनिक ताकद कमी होणे अशी लक्षणे आढळून आली आहेत तर मुलांमध्ये चिडचिडेपणा, सहानुभूतीचा अभाव आणि अस्थिर मानसिकता अशी लक्षणे आढळून आली.
सरकारच्या कुटुंब नियोजनेचं खोबरं केलं; 17 व्या मुलाचा बाप झाल्यानंतर म्हणाला गरिबीच प्रमाण…
धक्कादायक माहिती समोर
ज्यांना वयाच्या 13व्या वर्षी पहिला स्मार्टफोन (Smartphone Use) मिळाला त्यांचा सरासरी माइंड हेल्थ कोशेंट (MHQ) स्कोअर 30 होता. दुसरीकडे, ज्यांच्याकडे वयाच्या 5व्या वर्षी फोन होता त्यांचा स्कोअर फक्त 1 होता.