पंप अँड डंप : शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी कमावून देणारा घोटाळा; कशी होते सामान्यांची फसवणूक?

What Is Pump And Dump Scam In Stock Market : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची पद्धत सोपी झाल्यामुळे गेल्या काही वर्षात घोटाळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असाच एका स्कॅम ज्यात गुतंवणुकदारांची फसवणूक करून कोट्यवधींचा घोटाळा केला जातो. नेमका हा पंप अँड डंप स्कॅम काय? कशी केली जाते कोट्यवधींची कमाई याबद्दल जाणून घेऊया. UPI द्वारे सोने […]

Letsupp Image   2025 07 21T161714.427

Letsupp Image 2025 07 21T161714.427

What Is Pump And Dump Scam In Stock Market : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची पद्धत सोपी झाल्यामुळे गेल्या काही वर्षात घोटाळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असाच एका स्कॅम ज्यात गुतंवणुकदारांची फसवणूक करून कोट्यवधींचा घोटाळा केला जातो. नेमका हा पंप अँड डंप स्कॅम काय? कशी केली जाते कोट्यवधींची कमाई याबद्दल जाणून घेऊया.

UPI द्वारे सोने आणि मालमत्ता कर्जासाठी… केंद्र सरकारचा गेमचेंजर निर्णय, नवीन नियम कोणते?

नुकतीचे चर्चेत आली होती जेन स्ट्रीट

नुकतीच अमेरिकेतील एक मोठी जागतिक अल्गो ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटचे प्रकरण चर्चेत आले होते. या कंपनीने फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या नावाखाली गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्याचप्रमाणे, बाजारात पंप अँड डंप स्कीम चालते, ज्याद्वारे मोठे गुंतवणूकदार किरकोळ गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे लुबाडतात. शेअर बाजारात (Stock Market) पंप अँड डंप घोटाळ्यांमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. अशा घोटाळे करणाऱ्या आणि लहान गुंतवणूकदारांच्या पैशांशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सेबीदेखील कठोर कारवाई करते.

पंप अँड डंप का म्हटले जाते?

पंप अँड डंप सिस्टीम बाजारात बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. ही एक प्रकारची आर्थिक फसवणूक आहे. यामध्ये घोटाळेबाज प्रथम विशिष्ट शेअर खरेदी करतात आणि त्याची किंमत वाढवतात. त्यानंतर, संबंधित शेअर्सची किंमत वाढली की ते विकतात. त्यामुळे कंपनीचे शेअर्स अचानक कोसळतात. या सर्व प्रक्रियेला शेअर मार्केटच्या भाषेत पंप अँड डंप असे संबोधले जाते.

धक्कादायक! इंटरनेटशिवायही होतो सायबर हल्ला; मामोना रॅन्समवेअरचा धोका कसा टाळायचा? जाणून घ्या…

कसा केला जातो पंप अँड डंप स्कॅम

पंप अँड डंपमध्ये सगळ्यात पहिले मोठे गुंतवणूकदार पेनी स्टॉक किंवा कमी किमतीचा स्टॉकची निवड करतात. एकदा कोणते स्टॉक घ्यायचे हे निश्चl झाले की मोठ्या प्रमाणात संबंधित कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात. त्यानंतर अशा शेअर्सचा इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचार केला जातो.

संपत्तीच नाही, सोशल मिडीयासाठीही निवडावा लागणार वारस; जाणून घ्या प्रक्रिया…

यामुळे गुंतवणुकदारांना आणि सामन्यांना या स्टॉक्सबद्दल माहिती होते. सतत सतत याचे प्रमोशन केल्याने गुंतणुकदार या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतात. यामुळे स्टॉकचे मूल्य वाढते. एकदा संबधित स्टॉक्सची किंमत वाढली की मोठे गुंतणुकदार त्यांचे गुंतवलेले पैसे काढून घेतात आणि स्टॉक अचानक क्रॅश होतो. यामुळे लहान गुंतवणूकदारांचेमोठे नुकसान होते. पण, मोठे गुंतवणुकदार या पंप अँड डंप स्कॅममधून कोट्यवधींची माया गोळा करतात.

Exit mobile version