व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच येणार नवीन फीचर; फॅमिली अन् ऑफिस ग्रुपचे काम होणार सोपे

WhatsApp Pin Message Feature: व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना ग्रुप आणि वैयक्तिक चॅटमध्ये पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा सेट करण्याची परवानगी देईल. म्हणजेच, आपण पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा निवडण्यास सक्षम असाल व तो मेसेज किती काळ पिन केलेला राहील हे ठरविता येईल. सध्या हे अपडेट काही बीटा टेस्टर्सना दाखवण्यात आले आहे, ज्यावर […]

Letsupp Image   2023 06 23T174510.258

Letsupp Image 2023 06 23T174510.258

WhatsApp Pin Message Feature: व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना ग्रुप आणि वैयक्तिक चॅटमध्ये पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा सेट करण्याची परवानगी देईल. म्हणजेच, आपण पिन मेसेजसाठी वेळ मर्यादा निवडण्यास सक्षम असाल व तो मेसेज किती काळ पिन केलेला राहील हे ठरविता येईल. सध्या हे अपडेट काही बीटा टेस्टर्सना दाखवण्यात आले आहे, ज्यावर अजून काम चालू आहे. आगामी काळात कंपनी हे फीचर प्रत्येकासाठी आणू शकते.

या अपडेटची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटवर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. नवीन फीचर अंतर्गत, कंपनी यूजर्सला मेसेज पिन करण्यासाठी तीन पर्याय देईल, ज्यामध्ये यूजर 24 तास, 7 दिवस किंवा 30 दिवस मेसेज पिन करू शकतात.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अडकणार विवाहबंधनात? पाहा व्हिडीओ

हे फीचर ऑफिस ग्रुप आणि फॅमिली ग्रुपसाठी उपयुक्त आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येकासाठी महत्त्वाचे मेसेज पिन करून ठेवू शकता. कंपनी पिन मेसेज फीचरवर देखील काम करत आहे. हे वैशिष्ट्य लवकरच प्रत्येकासाठी आणले जाईल. सध्या अ‍ॅपवर पिन मेसेजची सुविधा उपलब्ध नाही.

‘मी तिकीट खरेदी करूनही…’ महाभारत फेम गजेंद्र चौहान Adipurush वर संतापले

व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच वापरकर्त्यांसाठी एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे जे त्यांना अनोळखी नंबरवरून येणारे कॉल शांत करण्याचा पर्याय देते. हे फीचर चालू ठेवल्याने तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलचा त्रास होणार नाही आणि कॉल आपोआप सायलेंट होईल. तुम्ही कॉल लिस्टमध्ये सायलेंट कॉल्स पाहण्यास सक्षम असाल. हे फीचर चालू करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये जावे लागेल.

 

Exit mobile version