रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अडकणार विवाहबंधनात? पाहा व्हिडीओ

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अडकणार विवाहबंधनात? पाहा व्हिडीओ

Rahmika-Vijay Devarkonda : दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही जोडी सुपरहीडट ठरली आहे. ही जोडी दाक्षिणात्याच नाही तर भारतीय चित्रपट चाहत्यांमध्ये कमालीची प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्यापसंतीस उतरलेली आहे. मात्र आता ते दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. (Rahmika Mandana and Vijay Devarkonda will marrie video viral )

‘मी तिकीट खरेदी करूनही…’ महाभारत फेम गजेंद्र चौहान Adipurush वर संतापले

काय आहे हा व्हिडीओ?

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आणि त्यानंतर दक्षिणात्य सुपरहीट जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये रश्मिका आणि विजय लंच डेटला गेल्याचं दिसत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय जवळचे मित्र-मंडळी दिसत आहेत. त्यामुळे आता लवकरच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by myloves 🧸’ (@viroshxoxo)

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. रश्मिकाचा अॅनिमल हा चित्रपटच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तसेच पुष्पा 2 आणि कुदुमुला हे तिचे आगामी चित्रपटच देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विजय देवरकोंडाचा ‘कुशी’चित्रपटच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो समंथा रूथ प्रभुसोबत दिसणार आहे.

फडणवीसांच्या ओळी, बाळासाहेबांचा व्हिडिओ अन्…; भाजपच्या वाघिणीनं ठाकरेंना डिवचलं

रश्मिका आणि विजय यांच्या या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यामध्ये एका नेटकऱ्याने रश्मिकाने वाढदिवसाला शेअर केलेल्या एका व्हिडीओचा स्क्रिनशॉट आणि विजयचा फोटो पोस्ट करत लिहीले होते की, रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत आहेत. ते एकाच घरात राहत आहेत त्यार रश्मिकाने रिप्लाय देक म्हटले होते. की, ‘अय्यो… जास्त विचार नको करी बाबू’ तिच्या या रिप्लायनंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube