Download App

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, आपोआप क्लिअर होणार Unread मेसेज

WhatsApp New Feature : आपल्या युजर्सना सेफ्टी देण्यासाठी तसेच कोणत्याही अडचणीविना व्हॉट्सॲप वापरण्यासाठी कंपनी नेहमी नवीन नवीन अपडेट लाँच करत

WhatsApp New Feature : आपल्या युजर्सना सेफ्टी देण्यासाठी तसेच कोणत्याही अडचणीविना व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरण्यासाठी कंपनी नेहमी नवीन नवीन फिचर लाँच (New Feature) करत असते. अशाच एक नवीन फिचर कंपनी लाँच करणार आहे. या नवीन फिचरमुळे आता यूजर्स अनरीड मेसेज ऑटोमॅटिक क्लिअर करू शकतात. व्हॉट्सॲपकडून या नवीन फिचरवर काम सुरु करण्यात आल्याची माहिती WA Beta Info च्या अहवालात देण्यात आली आहे.

WA Beta Info च्या अहवालानुसार, कंपनी या नवीन फिचरमध्ये यूजर्सला एक नवीन पर्याय देणार आहे. यामुळे यूजर्स जेव्हाही व्हॉट्सॲप उघडेल तेव्हा न वाचलेले मेसेजला ऑटोमॅटिक क्लिअर करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. सध्या या नवीन फिचरवर कंपनीकडून काम करण्यात येत आहे. या नवीन फिचरमुळे यूजर न वाचलेले मेसेज ऑटोमॅटिक क्लिअर करून नवीन मेसेजवर लक्ष केंद्रित करू शकतात अशी माहिती WA Beta Info च्या अहवालात देण्यात आली आहे.

WA Beta Info नुसार, नवीन फिचर लाँच झाल्यानंतर यूजर्सला न वाचलेल्या मेसेजेची संख्या ऑटोमेटिक क्लिअर करण्यासाठी पर्याय टॉगल करण्यास अनुमती देणार आहे. याचा अर्थ म्हणजे जेव्हा यूजर्स व्हॉट्सॲप उघडेल तेव्हा कोणतेही विद्यमान न वाचलेले मेसेज नोटिफिकेशन शून्यावर रीसेट करण्यात येईल. या फिचरचे प्राथमिक उद्दिष्ट व्हिज्युअल गोंधळ आणि असंख्य न वाचलेल्या मेसेजचे मानसिक ओझे कमी करणे आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना नवीन आणि महत्त्वाच्या मेसेजवर लक्ष केंद्रित करता येईल.

कंपनीकडून लाँच करण्यात येत असलेल्या या नवीन फिचरचा सर्वात जास्त फायदा ग्रुपमध्ये येणाऱ्या मेसेजसाठी होणार आहे. अनेक यूजर्स सर्व ग्रुपमधील मेसेज रीड करू शकत नाही यामुळे न वाचलेल्या मेसेजची संख्या वाढत जाते. मात्र आता या नवीन फिचरमुळे ऑटोमेटिक न वाचलेल्या मेसेजची संख्या रीसेट करण्यात येणार आहे. ज्याच्या फायदा अनेक यूजर्सला होणार आहे.

पोलिसांवर राजकीय दबाव? आमदार सुनिल टिगरेंनी दावा खोडला…

माहितीनुसार, कंपनीकडून या फिचरवर काम सुरु करण्यात आला असून काही बीटा व्हर्जनमध्ये हे फिचर लाँच करण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात सर्व व्हॉट्सॲप यूजर्ससाठी हा नवीन फिचर लाँच करण्यात येणार असल्याची माहिती WA Beta Info च्या अहवालात देण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज