Download App

बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सना व्हाट्सअप देणार ब्लू टीक; असा होणार फायदा…

WhatsApp कडून बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सना ग्रीन ऐवजी ब्लू टीक देण्यात येणार आहे. जेणे करून ते अधिकृत आहेत हे समजू शकेल.

WhatsApp will give Blue Tick to businesses and channels : व्हाट्स अॅप (WhatsApp) या सोशलमिडीया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक आणि चॅनेल्स (businesses and channels) त्यांच्या फॉलोअर्स आणि ग्राहकांशी संवाद साधत असतात. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतात. तसेच त्यांच्या व्यावसायाची जाहिरात करत असतात. तर या बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सना व्हाट्स अॅपकडून ग्रीन टीक दिलेली आहे. जेणे करून हे बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्स अधिकृत आहेत हे समजू शकेल. मात्र आता व्हाट्स अॅपकडून ग्रीन ऐवजी ब्लू टीक (Blue Tick) देण्यात येणार आहे.

दानवेंच्या प्रत्युत्तरात दरेकर चुकले; म्हणाले, महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा..,

हे अपडेट कंपनीकडून लवकरच करण्यात येणार आहे. ज्यामध्ये बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सना आता व्हाट्स अॅपकडून ग्रीन ऐवजी ब्लू टीक (Blue Tick) देण्यात येणार आहे. ही टीक इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणेच असणार आहे. सध्या या अपडेट चाचणी सुरू आहे. तसेच काही बीटा व्हर्जन वापरकर्ते ही ब्लू टीक पाहू शकत आहे.

भारीच ना …, फक्त 95 हजारात खरेदी करता येणार देशातील पहिली CNG Bike, जाणून घ्या फीचर्स

ग्रीन पेक्षा ब्लू टीकमध्ये फॉलोअर्स आणि ग्राहकांना बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्स अधिकृत असल्याची जास्त खात्री पटणार आहे. हा बदल पुढील आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्हाट्स अॅप आणखी एका नव्या फिचरवर काम करत आहे. ज्यामध्ये बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्स त्यांच्या वैयक्तिक चॅटमधूनच मिडीया आणि मेसेज त्यांच्या बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सवर पाठवू शकणार आहेत. त्यामुळे व्हाट्स अॅप (Whats App) या सोशलमिडीया प्लॅटफॉर्मवर बिझनेस अकाऊंट अन् चॅनेल्सना तसेच फॉलोअर्स आणि ग्राहकांना नवी सुविधा मिळणार आहे. जेणे करून त्यांचा वापर सुलभ आणि खात्रीशीर होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज