दानवेंच्या प्रत्युत्तरात दरेकर चुकले; म्हणाले, महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा..,

दानवेंच्या प्रत्युत्तरात दरेकर चुकले; म्हणाले, महायुतीचा शिव्या देण्याचा धंदा..,

Pravin Darekar On Ambadas Danve : विधान परिषदेत अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारच्या योजनांवरुन डायलॉगबाजी करत सडकून टीक केल्याचं दिसून आले. दानवेंनतर आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) उत्तर देण्यासाठी बोलत असताना ते चुकल्याचे दिसून आले आहेत. दरकेर डायलॉगच्या शेवटी म्हणाले, पुन्हा चालू राहील महायुतीचा शिव्या देण्याचा नेहमीच धंदा. त्यामुळे दरेकरांना नेमकं काय म्हणायचं होतं हे समजलं नाही.

गळ्यात कांद्याची माळ घालत बैलगाडीत लंकेंचं आंदोलन; ‘दिशाभूल’चा ठपका ठेवत विखेंवर टीकास्त्र

अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना लाडकी बहीण योजना, अर्थसंकल्पातील घोषणांवर भाष्य केलंय. ही योजना महिलांसाठी दमडीचा सौदा अन् हेलपाटे चौदा अशी स्थिती आहे. , राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. राज्यावर कर्ज असताना केलेल्या भरमसाट घोषणा म्हणजे तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा अशी स्थिती असल्याची टीका दानवेंनी केलीयं.

Alia Bhatt: ‘YRF स्पाय युनिव्हर्स’मध्ये आलियाची एन्ट्री; ‘मुंज्या’ फेम अभिनेत्रीसोबत देशासाठी लढणार!

अंबादास दानवे यांच्या भाषणानंतर प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. दरेकर म्हणाले, विरोधक म्हणतात की, खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा…विचारी तूच तुझ्या मना विकासाच्या दिसतात की नाही पाऊलखूणा..तुम्ही काही म्हणा निंदा अथवा वंदा महाराष्ट्राचा विकास करतात शिंदे- फडणवीस-अजितदादा. सर्वसामान्य माणूस युतीच्या मागेग उभा आहे खंदा, पुन्हा चालू राहील महायुतीचा शिव्या देण्याचा नेहमीच धंदा, असं प्रत्युत्तर दरेकरांनी दिलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी योजनेमुळे मध्यप्रदेशात भाजप निवडून आलं आहे, असं म्हणतात मात्र तेथील मुख्यमंत्र्यांना घरी बसावं लागलं आहे. ही योजना चांगली आहे. मात्र ती योग्य राबवली जाणार का? कारण यासाठी केलेली तरतुद केवळ 6 महिने पुरेल एवढीच असल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज