Mahakumbh 2025 : देशातील चार तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांवर महाकुंभ (Mahakumbh) आयोजित करण्यात येतो. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) सुरु होणार आहे. यासाठी तयारी देखील जोरात सुरु आहे. महाकुंभमेळा उज्जैनमधील शिप्रा नदी, प्रयागराज संगम, गंगा नदी हरिद्वार, गोदावरी नदी नाशिक येथे आयोजित करण्यात येतो. महाकुंभ मेळा सुमारे 45 दिवस चालतो. महाकुंभमध्ये स्नानासाठी व दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. यंदा प्रयागराज शहरात 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत महाकुंभ मेळा आयोजित करण्यात येणार आहे.
महाकुंभमेळ्यात शाहीस्नानाला विशेष महत्त्व असते त्यामुळे महत्त्वाच्या किंवा विशेष दिवशी शाही स्नानाचे आयोजन केले जाते. माहितीनुसार, 2025 च्या महाकुंभमेळ्यात तीन शाही स्नान आणि तीन सामान्य स्नान होणार आहे. पंचांगानुसार शाही व सर्वसाधारण स्नानाची तारीख ठरविली जाते. यंदा बसंत पंचमी, मकर संक्रांती आणि मौनी अमावस्या या दिवशी शाही स्नान होणार आहे.
शाही स्नान कधी होणार?
14 जानेवारी 2025 (मकर संक्रांती)
29 जानेवारी 2025 (मौनी अमावस्या)
3 फेब्रुवारी 2025 (बसंत पंचमी)
सामान्य स्नान कधी होणार?
13 जानेवारी 2025 (पौष पौर्णिमा)
12 फेब्रुवारी 2025 (माघी पौर्णिमा)
26 फेब्रुवारी 2025 (महाशिवरात्री)
तर दुसरीकडे यंदा चार ठिकाणांहून भाविकांना महाकुंभमेळ्यात प्रवेश करता येणार आहे. हर्षवर्धन तिराहा, काली मार्ग, जीटी जवाहर आणि बांगर चौक हे एंट्री पॉइंट करण्यात आले आहेत.
आर्थिक वाद अन् कोयत्याने पाच वार.., शुभदा कोदारे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
लोकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून ड्रोन कॅमेरे आणि सुमारे 1000 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. यासोबतच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (RPF) जवानही देखरेख ठेवणार आहेत.
अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असल्याचा दावा आम्ही करत नाही.