Government Schemes : महाराष्ट्रातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students)सायकल घेण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जात आहे. सायकल वाटप योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप (Free Cycle Scheme In Maharashtra)केले जाते. महाराष्ट्रामधील अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीआणि पुन्हा घरी व्यवस्थित येण्यासाठी रस्ते नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
अंकितांनी तीनच वाद सांगितले; पण पवार-पाटील घराण्यात संघर्षाची वात 50 वर्षांपूर्वीच पेटली आहे…
सायकल वाटप योजनेचे फायदे
– सायकल वाटप योजनेंतर्गत लाभार्थी मुलींना महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते,
– त्यामुळे मुलींसाठी सायकल विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
– या योजनेच्या मदतीने मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
– या योजनेच्या मदतीने मुलींना शाळेत जाण्या-येणासाठी पायी चालत जाण्याची गरज लागणार नाही.
– या योजनेमुळे मुलींच्या वेळेची बचत होईल
– मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल.
– या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
– या योजनेंतर्गत मुलींचे जीवनमान सुधारेल.
– मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
– राज्यातील मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
अशोक चव्हाण भाजपमध्ये… काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?
योजनेसाठी आवश्यक पात्रता :
– अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
– विद्यार्थिनी 8 वी ते 12 वी वर्गात शिकत असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
– सायकल वाटप योजनेचा लाभ फक्त 8 वी ते 12 वीत शिकणाऱ्या मुलींनाच देण्यात येईल.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या शाळेचे घरापासून अंतर 5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
– सायकल वाटप योजनेंतर्गत फक्त 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल व त्यावरील सायकलच्या खरेदीसाठी लाभार्थी मुलीस स्वतः जवळची रक्कम भरावी लागेल.
– महाराष्ट्राबाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– लाभार्थी मुलीला 8 वी ते 12 वी या 4 वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान मिळेल.
– गरजू मुलींना सायकल वाटप करताना डोंगराळ व अतिदुर्गम भागात राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य दिले जाईल.
– सायकल वाटप योजनेंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
– मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– सायकलच्या देखभालीचा खर्च लाभार्थ्यास स्वतः करावा लागेल.
सायकल वाटप योजनेत समाविष्ट शाळा
– शासकीय शाळा
– जिल्हा परिषद शाळा
– शासकीय अनुदानित शाळा
– ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये जा करावी लागते, अशा शाळेच्या मुलींना ही योजना लागू केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– शिधापत्रिका
– रहिवासी दाखला
– पासपोर्ट साईज फोटो
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
– बँक खाते
– विद्यार्थिनी 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र. (बोनाफाईड)
– सायकल खरेदी पावती
संपर्क साधा
सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या शाळेच्या ऑफिसशी किंवा प्राचार्यांशी संपर्क साधावा.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)