Download App

सावधान! आरोग्याच्या ‘या’ चुका हाडांना होईल धोका; काळजी घ्याच..

दरवर्षी 20 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस (World Osteoporosis Day 2024) साजरा केला जातो.

World Osteoporosis Day 2024 : दरवर्षी 20 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस (World Osteoporosis Day 2024) साजरा केला जातो. या दिवशी हाडांशी संबंधित समस्या आणि हाडांमध्ये फ्रॅक्चर या बाबत लोकांना माहिती दिली जाते. हाडांच्या समस्यांबाबत लोकांना माहिती देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 20 ऑक्टोबर 1996 रोजी युनायटेड किंगडम (United Kingdom) येथील राष्ट्रीय ऑस्टियोपोरोसिस सोसायटीने या दिवसाची सुरूवात केली होती. यानंतर 1997 मध्ये इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशनने या दिवसाला पाठिंबा दिला. यानंतर संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.

काय आहे ऑस्टिओपोरॉसिस?

ऑस्टिओपोरोसिस हा आजार शरीरात बोन मास डेन्सिटी म्हणजेच बीएमडीच्या कमतरतेच्या अवस्थेला म्हणतात. शरीरातील या स्थितीत हाडे कमकुवत होतात. यामुळे हाडे तुटण्याची शक्यता वाढते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. हाडांमध्ये वेदना, हाडांना त्रास होणे अशी काही लक्षणे या आजाराची आहेत.

World Food Day : हेल्दी अन् फिट राहायचंय, मग आजच आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश कराच!

काय आहेत कारणे?

पोषक घटकांची कमतरता आणि खराब लाइफस्टाइल ऑस्टीयोपोरोसिस होण्यामागे मुख्य कारण आहे. प्रामुख्याने व्हिटॅमिन डी जीवनसत्त्वाची कमतरता या आजाराचे आणखी एक मुख्य कारण आहे. मद्यपान आणि स्मोकिंगच्या सवयीने सुद्धा शरीरातील कॅल्शियम वेगाने कमी होते. यामुळे हाडे ठिसूळ होतात.

उपचार काय?

या आजारावर काही प्रभावी असा उपचार उपलब्ध नाही. परंतु रोजच्या दिनचर्येत बदल करून या आजाराचा प्रभाव निश्चित कमी करता येऊ शकतो. तुमचा डाएट आणि लाइफस्टाइल यांमध्ये काही अशा गोष्टी जोडल्या पाहिजेत ज्यामुळे हाडे मजबूत होतील. कॅल्शियमने समृद्ध आहार, नियमित व्यायाम, संतुलित आहार, व्हिटॅमिन डी असलेल्या खाद्य पदार्थांचे सेवन या गोष्टींकडे लक्ष दिले तर या आजारापासून दूर राहता येऊ शकते.

follow us