World Food Day : हेल्दी अन् फिट राहायचंय, मग आजच आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश कराच!
World Food Day 2024 : आज जगभरात विश्व खाद्य दिवस साजरा (World Food Day 2024) करण्यात येत आहे. सन १९४५ मध्ये याच दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी (United Nations) संघटनेची स्थापना झाली होती. जगातील उपासमारीचे संकट कमी करण्याच्या उद्देशाने कार्यवाही करणे हा उद्देश यामागे होता. या अंतर्गत १९७९ मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. यानंतर दरवर्षी १६ ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
या दिवसाचं एक महत्त्व आहे. अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराचे काय महत्त्व आहे याची माहिती लोकांना या दिवशी दिली जाते. जेवण आवश्यक आहे पण शरीराला निरोगी राखण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण खाद्य पदार्थांच्या स्वादावर लक्ष केंद्रित करतो पण चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करतो. येथेच बहुतांश लोक चूक करतात. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे आपणा सर्वांना माहिती असायला हवं की पौष्टिक आहार काय आहे? आणि डाएटसाठी सर्वात चांगले अन्न पदार्थ कोणते आहेत? आज जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने आरोग्यासाठी हेल्दी फूड कोणते आहे याची माहिती घेऊ या..
पाच, दहा की वीस..किती वेळा धुवावेत हात? हेल्दी आरोग्यासाठी किती आवश्यक, जाणून घ्या खास माहिती
हिरव्या पालेभाज्या आणि फळे
स्वस्थ शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या आहारात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे पौष्टिकतेने समृद्ध असतात. दररोज फळे आणि पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
ड्रायफ्रूटस् देतील बळकटी
सुका मेव्यात बदाम, काजू, पिस्ता, मनुके आणि अक्रोट यांचा आहारात समावेश करा. ड्रायफ्रूटस एका प्रकारे इम्यूनिटी बुस्टरचे काम करतात. विविध प्रकारच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराची मदत करतात. शरीराला अंतर्गत बळकटी देतात.
आहारात डाळींचा समावेश करा
तुम्ही रोजच्या आहारात डाळींचा समावेश केला पाहिजे. विविध प्रकारच्या डाळी आहेत. या सर्व डाळी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. उडीद डाळ, मुग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ या डाळीना आहारात समाविष्ट करा. डाळीत प्रोटीन, मिनरल्स आणि पौष्टिक तत्व मुबलक प्रमाणात असतात. यांमुळे आजारांपासून संरक्षण मिळते.
Living Planet Report : भारतीय अन्नपदार्थ जगात भारीचं; केंद्र सरकारच्या ‘मिशन मिलेट’ चीही प्रशंसा
साखर मीठ कमी करा
जास्त प्रमाणात साखर आणि मीठ दोन्हीही आरोग्यासाठी घातक आहे. म्हणून आहारात साखर आणि मीठ कमी प्रमाणात वापर करा. मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes) साखर खाण्याची मनाई असते. जास्त प्रमाणात मीठ खात असाल तर उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या निर्माण होण्याचा धोका राहतो. त्यामुळे वयाची तीस वर्षे पार केल्यानंतर साखर आणि मिठाचे अतिप्रमाणातील सेवन बंदच करा.