खासगी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात, ‘या’ आजारांचा सर्वाधिक धोका; अहवालातून धक्कादायक खुलासा

खासगी कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात, ‘या’ आजारांचा सर्वाधिक धोका; अहवालातून धक्कादायक खुलासा

Job in Private Sector : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांची लाइफस्टाइल (Job in Private Sector) अत्यंत खराब असते. आता एक अहवाल समोर आला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच एक सर्वे करण्यात आला होता. यात दिसून आले की खासगी क्षेत्रात काम करणारे 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोक लाइफस्टाइलशी संबंधित आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. यात डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणाव यांसारख्या आजारांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊ या की हे आजार नेमके का वाढत आहेत.

सर्वेतून धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एक सर्वे करण्यात आला. यात असे दिसून आले की 20 टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. 14 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाली आहे. 6.3 टक्के कर्मचारी लठ्ठपणाच्या विळख्यात सापडले आहेत. 3.2 टक्के लोकांना हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रासले आहे. तर 1.9 टक्के लोकांना किडनीचे आजार असल्याचे समोर आले आहे.

बापरे! देशातील ‘या’ शहरांना प्रदुषणाचा विळखा, दिल्लीचा दुसरा नंबर; अहवालातून खुलासा

सर्वात चिंताजनक म्हणजे 50 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी मानसिक ताणतणावांनी ग्रस्त झाले आहेत. यामुळे या आजारांची तीव्रता वाढली आहे. मानसिक ताणतणाव कमी करण्याची अत्यंत गरज आहे. परंतु, टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात कंपन्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. सर्वेत सहभागी असलेल्या 63 टक्के लोकांनी मान्य केलं आहे की आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणे खूप कठीण बनले आहे. यामुळे समस्या आधिक वाढत चालल्या आहेत.

आजारांचा धोका का वाढतोय..

मुंबईतील सिनियर फिजीशियन डॉ. अजय शर्मा म्हणाले, की खासगी क्षेत्रातील रोजगारांचं बदललेलं स्वरुप या आजारांसाठी जबाबदार आहे. आजकाल ऑफीसमध्ये नऊ ते दहा सात बसून काम करणे खूप सामान्य झाले आहे. बराच वेळ एकाच जागेवर बसून राहिल्याने लठ्ठपणा आणि सांध्यांत वेदना होण्याचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त जंक फूड आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांना चालना देत आहे. अनेक कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. त्यामुळे शरीराला झोप कमी मिळते. मेंदूला आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे तणावही वाढतो तसेच हृदय आणि किडनीवर या गोष्टीचा वाईट परिणाम होतो.

सावधान! स्मोकिंग न करताही होतोय ‘हा’ कॅन्सर, अहवालाने वाढली धाकधूक; वाचा सविस्तर..

‘या’ अडचणीही ठरतात त्रासदायक

दिल्लीतील कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रिया गुप्ता यांनी सांगितले की आजकाल बहुतांश लोक लॅपटॉप आणि मोबाइलवर काम करत असतात. याशिवाय कामाच्या दडपणामुळे लोक व्यायाम आणि योगासाठी वेळ काढू शकत नाहीत. यामुळे समस्या आणखी वाढल्या आहेत. तणाव कमी करण्यासाठी योग आणि मेडिटेशन करणे आवश्यक आहे. कार्यालयात प्रत्येक दोन तासांनंतर किमान पाच मिनिटे चालत राहा. आरोग्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube