बापरे! देशातील ‘या’ शहरांना प्रदुषणाचा विळखा, दिल्लीचा दुसरा नंबर; अहवालातून खुलासा

Air Pollution Report : राष्ट्रीय राजधानी दिल्ली अजूनही दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात (Air Pollution) प्रदूषित शहर आहे. तर आसाम आणि मेघालय या राज्यांच्या सीमेवरील बरनीहाट शहर पहिल्या (Delhi Pollution) क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नोंदवण्यात आले आहे. ऊर्जा आणि स्वच्छ वायू अनुसंधान केंद्राने (सीआरईए) जारी केलेल्या अहवालातून (Pollution in India) ही माहिती समोर आली आहे.
संस्थेने दोन दिवसांपूर्वी हा अहवाल जारी केला. चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील हवा गुणवत्तेचे विश्लेषण करून हा अहवाला तयार करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या अभ्यासातील एकूण 293 पैकी 239 शहरांत 80 टक्क्यांपेक्षा जास्त दिवस पीएम 2.5 ची माहिती उपलब्ध होती. 122 शहरांनी वार्षिक राष्ट्रीय परिवेशी वायू गुणवत्ता मानक 40 मायक्रोग्राम प्रति घनमीटर पार केले. 117 शहर मात्र या मर्यादेच्या आतच राहिले.
बापरे! प्रदूषणात भारताचे रेकॉर्ड, तब्बल 13 शहरे प्रदुषित;’या’ शहराचा पहिला नंबर
सर्व 239 शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक मानक 5 मायक्रोग्राम प्रति घनमीटर या नियमाला पार केले. म्हणजेच वायू गुणवत्तेच्या भारतीय मानकानुसार या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये एकूण 122 शहरे प्रदूषित राहिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचा विचार केला तर सर्व 239 शहरे प्रदूषणाच्या यादीत येतात.
रिपोर्टनुसार बर्नीहाटमध्ये पीएम 2.5 पातळी सरासरी 133 मायक्रोग्रॅम घनमीटर आहे. या शहरात वर्षातील पहिल्या सहामाहीत हवेची गुणवत्ता अतिशय खराब राहिली. एकही दिवस चांगली गुणवत्ता असलेला नव्हता.राजधानी दिल्ली शहरात पीएम 2.5 ची पातळी 87 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर राहिली.
दिल्लीत वायू प्रदूषण जीवघेणे
दिल्लीत 10 जानेवारी 2025 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक पीएम 2.5 निकषाला पार केले. तसेच 5 जूनपर्यंत एनएक्यूएसची पातळीही ओलांडली गेली. याचा अर्थ असा की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्हीही निकषांचे उल्लंघन झाले. आता बाकीच्या दिवसात दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती सुधारेल याची शाश्वती राहिलेली नाही. बर्नीहाट आणि दिल्लीव्यतिरिक्त दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांत हाजीपूर, गाझियाबाद, गुरुग्राम, सासाराम, पटना, तालचेर, राउरकेला आणि राजगीर या शहरांचा समावेश आहे.
धक्कादायक! पाच महिन्यांत भारतात 10 दिवस सर्वाधिक प्रदूषण; ‘या’ शहराचा पहिला क्रमांक
प्रदुषणाचा आरोग्याला धोका
पीएम 2.5 च्या अत्याधिक प्रमाणामुळे श्वासासंबंधी गंभीर समस्या निर्माण होतात. हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ स्टडीनुसार 2009 ते 2019 दरम्यान प्रत्येक वर्षी भारतात जवळपास 15 लाख मृत्यू दीर्घकाळ पीएम 2.5 प्रदुषणाच्या संपर्कात राहिल्याने झाले होते. वायू प्रदुषणामुळे (Air Pollution) भारतात सरासरी आयुष्यमान 5.2 वर्षांनी घटत चालले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी वैज्ञानिक आणि आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्यानुसार भारताने वायू गुणवत्ता डेटा गोळा करण्यात प्रगती केली आहे. परंतु, आता यात ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.