Ajit Pawar Controversial Statement about Fund for constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी मतदार संघासाठी निधी ( Fund for constituency ) देण्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य ( Controversial Statement ) केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
लागेल तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी मतदार संघासाठी निधी देण्याबाबत केलं आहे. ते इंदापूर तालुक्यातील एका ठिकाणी प्रचार सभेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
आमचं नाव न घेणाऱ्याला असं इंजेक्शन टोचा की… डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य
तर त्या अगोदर डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी देखील त्यांनी विरोधकांवर काही थेट टीका तर काही मिश्किल भाष्य करत हा मेळावा गाजवला. त्यामध्ये अजित पवार डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही सहज खूप काही काम करू शकता. माणूस खर कोणाशी बोलत असेल तर डॉक्टरांशी. कारण काय वेदना होतात हे सांगितल्याशिवाय त्यावर उपचार होत नाहीत.
बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मात्र, हे उपचार करताना त्याला थोड बोला की काय चाललय, मनात काय आहे. असं सगळ बोलताना पेशंटने जर आमच नाव घेतलं तर त्याला चांगली वागणूक द्या. मात्र, दुसरं काही नाव घेतलं तर त्याला असं इंजेक्शन टोचा की असं म्हणत सॉरी मला असं काही म्हणायच नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले.