Download App

तर मला लाज वाटली असती… भरसभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंना टोला

Ajit Pawar On Supriya Sule : राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामतीच्या जागेची राजकीय वर्तुळात होत आहे. यावेळी बारामती

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Supriya Sule : राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी सर्वात जास्त चर्चा बारामतीच्या जागेची राजकीय वर्तुळात होत आहे. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून (MVA) बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना तर महायुतीकडून (Mahayuti) सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भोर येथे जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, ही निवडणूक भावकी गवकीची नाहीतर राष्ट्रीय निवडणूक आहे. ही निवडणूक रोजी रोटीची आहे. त्यामुळे तुम्ही देशाला पुढे नेणाऱ्या मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी मतदान करा असं अजित पवार म्हणले.

तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका करत अजित पवार म्हणाले, बारामती मतदारसंघात असणाऱ्या आत्ताच्या खासदारांनी पुस्तिका छापली आणि त्या पुस्तिकेमध्ये मी केलेली कामं छापून ते काम मी केलं.. मी केलं म्हणत आहे. विद्यमान खासदार फक्त भाषणं करत आहे तुम्ही त्यांना 3 वेळा निवडून दिला मात्र तुम्हाला काय मिळाला असा सवाल त्यांनी जाहीर सभेत उपस्थित करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

त्यांनी भोरची फसवणूक केली, त्यांनी इथे येऊन एमआयडीसीचे स्वप्न दाखवले मात्र एमआयडीसी आली नाही. तरीही देखील तुम्ही त्यांना 3 वेळा निवडून दिला मात्र आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून द्या मी भोरला एमआयडीसी देणार. मी शब्दाला पक्का आहे असं अजित पवार म्हणाले.

‘तू किस झाड की पत्ती है’, तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकरांचा इशारा

पुढे अजित पवार म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी एमआयडीसीच्या नावावर मत मागितली मात्र एमआयडीसी आली नाही. तरीही देखील खासदार 2019 ला मत मागायला आले मी असतो तर मला लाज वाटली असती की, कोणत्या तोंडाने मत मागावे असा टोला त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना लावला.

follow us