‘तू किस झाड की पत्ती है’, तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकरांचा इशारा

‘तू किस झाड की पत्ती है’, तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकरांचा इशारा

Omraje Nimbalkar On Tanaji Sawant : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सध्या सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत असून विरोधी पक्षावर टीका करताना दिसत आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Lok Sabha) देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तर आता ओमराजे निंबाळकर यांनी देखील तानाजी सावंत यांच्यावर टीका करत त्यांना इशारा दिला आहे.

एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी तू किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत तानाजी सावंत यांचा नाव न घेता इशारा दिला आहे. या सभेत बोलताना धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर म्हणाले , 40 वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना मी गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है अशा शब्दांत त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते आरोग्य मंत्री तानाजी सावंत

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करत म्हणाले होते की, सगळ्या सहकारी संस्थाची याने अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला व अन् भंगार विकलं. खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं , तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं राण केलं, या सावंत सरांनी तुझ्यासाठी या शेतकऱ्यांची कष्टाची साखर गोडावूनला होती ती 60 लाख क्विंटल विकली, अशा शब्दांत मंत्री तानाजी सावंत यांनी टीका केली होती.

सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

12 बँक खाते, 9 वाहनांसह शांतीगिरी महाराजांकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

तर महायुतीकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube