12 बँक खाते, 9 वाहनांसह शांतीगिरी महाराजांकडे आहे कोट्यवधींची संपत्ती
Shantigiri Maharaj Wealth Worth : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) आज शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj ) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जाबरोबरच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र देखील दिला आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल 38 कोटी 81 लाख इतकी संपत्ती आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण 38 कोटी 81 लाख 53 हजार 533 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. याच बरोबर त्यांच्यावर 75 हजार रुपयांचे कर्ज आहे. शांतीगिरी महाराज यांच्याकडे सफारी, टेम्पो, पिकअप, दोन स्कूलबस, टाटा 407, हायवा, एसयूव्ही, टीयूव्ही अशी वाहने आहे त्यांची किंमत 67 लाख 91 हजार 486 रुपये आहे. याच बरोबर त्यांच्याकडे विविध ठिकाणी मठ, गुरुकुल, शेती आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 12 बँक खाते असून त्यामध्ये 70 हजार 458 रुपये जमा आहे. तर त्यांच्याकडे फक्त 50 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्या नावावर एफडी आणि विमा पॉलिसी देखील आहे. ज्यांची किंमत 2 लाख 56 हजार 720 रुपये आहे.
तुम्हाला जर कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल तर …. शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
तर दुसरीकडे स्थावर मालमत्तेत त्यांच्याकडे तब्बल 53 ठिकाणी वारसा हक्क आणि स्वमालकीची शेतजमीन आणि निवासी संकुल आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ, कन्नड, खुलताबाद, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नगर जिल्ह्यातील कोपरगाव आदी ठिकाणी या मिळकती आहे.