Download App

राहुलला आमचं घड्याळ हाती घ्यायला सांगा, उद्या मंत्री करतो, भरसभेत अजित पवारांची राहुल कुलांना मोठी ऑफर

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यावेळी या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Rahul Kul : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यावेळी या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होणार आहे. यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी दौंड येथे जाहीर सभा घेतली आहे. या सभेत बोलताना अजित पवार यांनी थेट राहुल कुल (Rahul Kul) यांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार या सभेत म्हणाले, आजपर्यंत आम्ही एकमेकांविरोधात निवडणुकीत लढत होतो मात्र आता राज्याचे राजकीय समीकरणे बदलली आहेत. जर राहुल कुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्यांना उद्या मी मंत्री करतो, तुम्हाला माहिती आहे आपला शब्द म्हणजे शब्द असतो. अशी ऑफर अजित पवार यांनी सभेत बोलताना राहुल कुल यांना दिली.

सध्या राहुल कुल भाजपचे आमदार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सांगून राहुल यांना मंत्री करायला सांगतो, असेही अजित पवार या सभेत म्हणाले.

तर पुन्हा एकदा अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून जे खासदार निवडणूक गेले, ते फक्त भाषणच करतात. मात्र फक्त भाषण करून मतदारसंघात विकास होणार नाही, लोकांच्या समस्या सुटणार नाही अशी टीका सभेत बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

.. तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार, वचननाम्यात ठाकरे गटाकडून भाजपवर हल्ला

मी तुम्हाला शब्द देतो, राहुल आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही राहुलला आमचं घड्याळ हाती घ्यायला सांगा, त्यांना उद्या मंत्री करतो, जर राहुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्यांना उद्या मंत्री करणार. हा पोरगा चांगला आहे, असे मी उद्या उपमुख्यमंत्री फडणवीसांना सांगणार आहे की त्यांना मंत्री केले तर आमदार वाढतील, असं अजित पवार म्हणाले.

follow us