Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी वरून राजकारण तापत आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe Patil) निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे मंत्री असलेले विखे हे केवळ नगर जिल्ह्यातच फिरतात. स्वतःचे उमेदवाराचं कौतुक सोडून हे शरद पवार (Sharad Pawar) व माझ्यावरती टीका करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर निशाणा साधला.
जिल्ह्याचे पालकमंत्री जे आपल्याकडे फिरत असतात ते महाराष्ट्राचे मंत्री असूनही नगर जिल्ह्यातच फिरतात. पवार साहेबांवरती टीका करत भाषणाला सुरुवात करतात. स्वतःच्या उमेदवाराचा कौतुक न करता पवार साहेबांवर टीका करतात. त्यांनी माझ्यावर देखील आरोप केले, आम्ही एका पतसंस्थेला राजकीय आश्रय दिला मात्र आम्ही चुकीच्या विषयाला कधीच आश्रय देत नाही. परंतु मंत्री महोदय यांच्या प्रवरा पतसंस्थेला रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली तेथे घोटाळे झाले.
चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला की ठेवीदारांच्या ठेवी द्या तसेच निवेदनामध्ये म्हटले की महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडा व अन्यथा महसूलमंत्र्यांवरती कारवाई करावी असे शासनाला पत्र देण्यात आलं. मी गणेश कारखाना चालवायला घेतला आता तो सुरळीत सुरू आहे यांनी ज्या ज्या संस्था चालवायला घेतला त्याचे वाटोळं केलं या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या.. एवढी निवडणूक होऊ द्या आम्ही देखील मागे सरणार नाही. सत्ताधारी लोकसभा निवडणुकीवरून लक्ष आठवण्यासाठी शरद पवार तसेच माझ्यावरती आरोप करतायेत असा आरोप देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला.
माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ
तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले की, आम्ही काय काम केले यावरून आम्हाला विचारणा केली जात आहे मात्र वेळ आली की आम्ही देखील काय काम केली व तुम्ही काय केलं हे देखील आम्ही दाखवून देऊ ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय केला ते शेतकरी देखील तुमच्यासमोर उभे करणार आहोत. राहत्या मध्ये जे दहशत आहे ती दहशत देखील आम्ही मोडून काढणार हे देखील लक्षात ठेवा असा इशारा देखील यावेळी थोरात यांनी विखेंना दिला.