Download App

ठाकरे, पवारांना सहानुभूती नाही, महाराष्ट्रात लाट मोदींचीच; चंद्रकांत पाटलांना ठाम विश्वास

महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. मोदींची लाट नाही, असे विरोधक सांगत आहे. हे परंतु हे वरवरचे आहे.

  • Written By: Last Updated:

BJP leader chandrakant Patil On 45 plus seat Mahrashtra : महाराष्ट्रात महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे मिशन ठेवले आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) जिंकण्यासाठी मोठी रणनिती आखत ताकद लावली आहे. हे दोन्ही मिशन कसे यशस्वी होईल, याचे गणित भाजप नेते (BJP) व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडले आहे.


कधी रडायचं, कधी आजारी पडायचं, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाही; गिरीश महाजनांचा पवारांना टोला


मोदींची लाट आहे का ?

महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही सहानुभूतीची लाट नाही. मोदींची लाट नाही, असे विरोधक सांगत आहे. हे परंतु हे वरवरचे आहे. कारण ग्राउंड लेव्हलचा माणूस मोदींनाच मतदान करणार आहे. आज ते त्याचे काम करत आहे. परंतु मतदानाच्या दिवशी तो मोदींसाठीच मतदान करणार आहे. त्याचे कारण म्हणजे मोदींची एक व्होट बँक तयार झाली आहे. ही व्होट बँक जात, पंथा, भाषाच्या पुढे गेली आहेत. विविध योजनांचे लाभार्थी त्यांची व्होट बँक आहे. ते आता त्यांच्या जातीतील माणसांचे एेकत नाही. त्यांना उडवून लावत आहे. मुस्लिम लोकही मोदींनाच मत देणार आहे. कारण त्यांनी कोरोना लस देताना दुजाभाव केलेला नाही. मतदारांना मोदींना मनामध्ये ठेवले आहे. ही व्होट बँक सायलेंट आहे. त्यामुळे आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे, आजच जिंकला आहे.. लाभार्थी व्होट बँक सायलेंट आहे. ती मतदानामध्ये व्यक्त होते. 45 जागा आम्ही आजही जिंकल्या आहेत. तीन जागांवर खूप मेहनत घेत आहे. तीन जागांपैकी बारामतीमध्ये आम्ही शंभर टक्के विजयी होणार आहे.

अमेठी अन् रायबरेलीसाठी काँग्रेसचा स्पेशल प्लॅन : दोन सर्वात अनुभवी शिलेदार मैदानात

बारामती मतदारसंघ कसे जिंकणार आहे.
यंदा बारामती मतदारसंघ महायुती जिंकणार आहे. गेल्यावेळेस आम्ही काही ठिकाणी कमी पडलो होते. गेल्या वेळी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तामामा भरणे हे आमच्याबरोबर नव्हते. तरीही आमच्या उमेदवाराला 68 हजार मते मिळाली होती. यंदा दोघे आमच्याकडे असल्याने येथून मताधिक्य मिळाले होते. दौंडमध्ये कांचन कुल यांनी सात हजाराचे लीड मिळाले होते. आता आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात हे आमच्याबरोबर आहे. त्यामुळे तेथेच 70 हजारांचा लीड आम्हाला मिळणार आहे. खडकवासला मतदारसंघात एक लाखांपेक्षा जास्त मार्जिन आम्हाला मिळणार आहे. भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे, कुलदीप कोंडे हे आमच्याबरोबर आहे. तर पुरंदरचे विजय शिवतारे हे लीड मिळून देतील. या मतदारसंघात साडेसात लाख शहरी मतदार आमच्याबरोबर आहे. त्यामुळे आम्ही येथून जिंकणारच, असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

follow us