Download App

… म्हणून उद्धव ठाकरे शिवराळ भाषेत बोलत आहे, फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुतीकडून (Mahayuti) जोरदार प्रचार होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून देखील जाहीर सभा घेतल्या जात आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत भाष्य करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईच्या 6 लोकसभा जागांपैकी तीन जागा भाजप (BJP) आणि तीन जागा शिवसेना (Shivsena) लढवणार असा निर्णय महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान आम्ही घेतला होता मात्र सुरुवातीच्या काळात या जागांवर आम्ही आमचे उमेदवार द्यावे असे आमच्या मनात होते त्यामुळे आमचे काही नेते या मतदारसंघात तयारी देखील करत होते मात्र 15-20 दिवसांपूर्वीच आम्ही निर्णय घेत या जागा शिवसेनेसाठी सोडले आहे.

तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांची निराशा, हताशा आणि नसलेले मुद्यावरून ते आमच्यावर टीका करत आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते शिवराळ भाषेत बोलत आहे मात्र त्यांनी कितीही शिवराळ भाषेत बोलले तरीही देखील जनता आमच्या सबोत आहे. त्यांना जनता मतदान करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुनेत्रा पवार यांचा आज बारामती दौरा; ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त स्वागत..

यावेळी राज्यात फडणवीस यांच्या काळात झालेल्या विकासकामासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार व्यक्त केला. या काळात मोदीजी अतिशय खंबीरपणे माझ्यासाबोत उभे होते असं देखील फडणवीस म्हणाले.

T20 World Cup 2024 साठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिक पांड्या उपकर्णधार

follow us