Baramati Lok Sabha: मी जे काम हाती घेते ते पूर्णत्वाला नेतेच:सुनेत्रा पवारांची ग्वाही
Sunetra Pawar: बारामती मतदारसंघात (Baramati Constituency) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. आज (30 एप्रिल) सुनेत्रा पवार बारामती तालुक्यात प्रचारासाठी आले होते. त्यांनी सकाळी सावंतवाडी येथून आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
यावेळी सावंतवाडी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचं सांगत ओढा खोलीकरणासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचे सुनेत्रा पवार म्हणाले.
निवडणूक आल्यानंतर बारामती तालुक्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दुवा म्हणून मी काम करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बारामतीकरांना दिला. तसेच मी जे काम हाती घेते ते पूर्णत्वाला नेतेच हे बारामतीकरांना ज्ञात असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद करत सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीही जाणून घेत त्यांना लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले.
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार चांगलीच टक्कर देत असल्याची चर्चा सध्या बारामती मतदारसंघात होत आहे. तर दुसरीकडे बारामती मतदारसंघात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.
T20 World Cup 2024 साठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिक पांड्या उपकर्णधार
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असून या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे.
महाबचत ऑफर! अवघ्या 20 हजारात खरेदी करता येणार iPhone 12, iPhone 14