तुम्ही खासदार होणारच, पण अजितदादाही मुख्यमंत्री होणार; ज्येष्ठ नागरिकाचा सुनेत्रा पवारांना आशीर्वाद

  • Written By: Published:
तुम्ही खासदार होणारच, पण अजितदादाही मुख्यमंत्री होणार; ज्येष्ठ नागरिकाचा सुनेत्रा पवारांना आशीर्वाद

Baramati Lok Sabha Election Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या (Baramati Lok Sabha Election) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार सुरू आहे. त्यांना जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. खडकवासला भागात त्यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यांना ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद ही दिले आहे.

पवारांनी तुमचं राजकारण संपवलं तेव्हा आम्ही साथ दिली; फडणवीसांची मोहिते पाटील कुटुंबावर टीका

सुनेत्रा पवार या आज बिबवेवाडी परिसरात नागरीकांच्या भेटी घेत आहेत. या दरम्यान, एका सोसायटीत एका ज्येष्ठ व्यक्तीने सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले .त्यावर या ८८ वर्षीय आजोबांनी तुम्ही खासदार तर होणारच, पण अजितदादाही लवकरच मुख्यमंत्री होतील अशा शब्दात भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.

आढळराव तीन लाख मतांनी विजयी होणार, आमदार मोहितेंनी घेतली विजयाची गॅरंटी


क्रिकेटचा लुटला आनंद

सुनेत्रा पवार यांनी क्रिकेटचा आनंद देखील घेतला.
सुनेत्रा पवार या आज दत्तनगर, आंबेगाव परिसराच्या दौऱ्यावर असताना या दरम्यान, त्यांनी विविध सोसायट्यांना भेट देत नागरीकांशी संवाद साधला.. लेक विस्टा सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या महिलांसमवेत सुनेत्रा पवार याही सहभागी झाल्या आणि त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube