Girish Mahajan On Sharad Pawar : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्य्यात मतदान पूर्ण झाला आहे तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. उद्या बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 11 लोकसभा मतरदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या मतदानापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार रोहित पवारांवर (Rohit Pawar) भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जोरदार टीका केली आहे.
जळगाव येथे माध्यमांशी बोलताना, कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं असं भावनिक होऊन शरद पवार आणि रोहित पवार निवडणूक लढवत आहे मात्र भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाही. जर तरुणांची ताकद तुमच्यामागे आहे तर तुम्ही देशाच्या मुद्यांवर बोला आणि मत मागा असा टोला गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार आणि रोहित पवारांना लावला आहे.
तर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली आहे. अनेक वर्ष उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा त्यांना सर्व गोड वाटलं का? तेव्हा ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कौतुक करत होते मात्र विरोधात असल्याने काहीही बोलत आहे. आमच्या भरोशावरच त्यांचे 18 खासदार आणि 55 आमदार जिंकून आले. ठाकरे यांच्या भरोशावर 15 तरी आमदार निवडून आले असते का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं असं माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले.
ICC Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयकडून भूमिका स्पष्ट
आज सकाळी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व 8 जागा निवडून आणायच्या विश्वास व्यक्त केला. याच बरोबर त्यांनी राज्यातील इतर राजकीय विषयांवर देखील भाष्य केले.