Download App

सांगलीच्या जागेवरून मविआत धुसफूस! विशाल पाटील बंडखोरी करणार?

  • Written By: Last Updated:

Sangli Lok Sabha : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून धुसफुस सुरू आहे. मविआत सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. ठाकरे गटाने या मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. अशातच विशाल पाटलांनी (Vishal Patil) सांगलीबाबतचा निर्णय उद्यापर्यंत होईल, आम्हाला काही टेन्शन नाही, असं सूचक विधान केलं.

PM मोदी आज विदर्भात, चंद्रपूरमधून मुनगंटीवारांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार 

विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. मात्र ठाकरे गटाने सांगली लोकसभेचा उमेदवार जाहीर करून पाटील, कदम यांच्यासह सांगलीतील काँग्रेस नेत्यांची गोची केली. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतल्यानं पाटील सांगलीत बंडखोरी करणार असल्याची आहे.

अवकाळी पावसाचं संकट कायम! विदर्भ, मराठवाड्यात पावसाची इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट 

चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गट माघार घेत नाही आणि काँग्रेसही सांगलीच्या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जाहीर शाब्दिक युद्धाला सुरूवात आहे. संजय राऊतांनी सांगलीत जाऊन विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावर टीका केली. त्यानंतर कॉंग्रेसनही राऊत यांचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पत्रातून दिला होता.

Threat to Sujay Vikhe : सुजय विखेंना धमकीची क्लीप व्हायरल... | LetsUpp Marathi

त्यानंतर काल आयोजित केलल्या इफ्तार पार्टीत विशाल पाटील यांनी आम्ही टेन्शन घेत नाही, उद्या निर्णय घेतला जाईल, असं विधान केलं. दरम्यान, ते आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय निर्णय घेणार? कोण माघार घेणार ? असे प्रश्न विचारले जात आहे. सांगलीत लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद अद्याप मिटलेले नसल्यामुळे पाटील हे बंडखोरी करतील, अशीही चर्चा आहे. त्यामुळं आज विशाल पाटील काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वांचं आहे.

follow us