Jayashree Patil to join BJP: वसंतदादा पाटलांच घर फुटलं, एक टीम भाजपमध्ये गेलीच

  • Written By: Published:
Jayashree Patil to join BJP: वसंतदादा पाटलांच घर फुटलं, एक टीम भाजपमध्ये गेलीच

Jayashree Patil to join BJP: राज्याच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशाचे लोणच सुरू आहे. माजी आमदार, पदाधिकारी महायुतीत येतायत. त्यात सांगलीमध्ये भाजपने एक मोठी खेळी केलीय. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून व माजी मंत्री मदन पाटील यांची पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil ) यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय. हा काँग्रेसला (Congress) मोठा धक्का आहे. जयश्री पाटील यांना पक्षात घेतल्याने सांगलीत भाजपला (BJP) काय फायदा होईल ? जयश्री पाटील यांना काय ऑफर दिलीय हेच या व्हिडिओतून पाहुया…

Iran Israel Conflict हवाई क्षेत्र बंद; पण भारतीयांना मायदेशी पाठवण्यासाठी इराणचा शब्द

भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह स्थानिक नेतेही उपस्थित होते. हा औपचारिक पक्ष प्रवेश होता. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश होईल. (Jayashree Patil to join BJP)


सांगली पॅटर्नचा गाजावाजा पण…

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न जोरदार गाजला होता. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत विजय खेचून आणला होता. त्यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचा लाखभर मतांनी पराभव केला. त्यांच्या विजयात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, त्यांच्या वहिनी जयश्री पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र हा पॅटर्न चालला नाही. सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी केली. त्यात भाजपचे सुधीर गाडगीळ हे निवडून आले. बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले.

ऑपरेशन सिंदूननंतर पहिल्यादांच 5 ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान भिडणार , ICC ची मोठी घोषणा


सांगली महापालिकेत मोठे खिंडार पडणार?

जयश्री पाटील या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. विधानसभा निवडणुकीला त्यांना तीस हजारांहून अधिक मते मिळाली होती. सांगली महापालिकेत जयश्री मदन पाटलांना मानणारा एक गट आहे. माजी नगरसेवकांचा तो गट ही त्यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय.


जयश्री पाटलांना विधानपरिषदेची उमेदवारी ?

जयश्री पाटलांना पक्षात घेताना भाजप नेत्यांनी काही आश्वासने दिली असल्याचे समोर येत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन जागा देणे. वसंतदादा शेतकरी बँकेच्या चौकशीचा ससेमिरा थोपविणे, रिक्त असलेल्या सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी असे शब्द भाजपकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने वसंतदादा घराण्यात एकप्रकारे फूटच पडलीय. त्यामुळे काँग्रेसला मानणारे अपक्ष खासदार विशाल पाटील यांची भविष्यातील वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे. तर तिकडे काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित पाटील यांचीही राजकीय कोंडी होणार आहे. वसंतदादा घराण्यातील एक गटबरोबर आल्याने भाजपची मात्र सांगलीत ताकद आणखी वाटलीय. परंतु जयश्री पाटील यांचा राजकीय फायदा किती होईल हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube