सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटलांची नातसून भाजपमध्ये प्रवेश करणार

Jayashree Patil to join BJP: सांगलीमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री मदन पाटील (Jayashreetai Patil) यांचा भाजपप्रवेश (BJP) निश्चित झालाय. जयश्री पाटील या काँग्रेसमध्ये होत्या. विधानसभाला बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
भाजपचे नेते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील जयश्रीताई पाटील यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा नेते शेखर इनामदार, सी. बी. पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम आदी उपस्थित होते. स्थानिक विकास, सहकार आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान अन् भारताला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबा
ही भेट भाजप पक्षप्रवेशाबाबत होती. चंद्रकांत पाटील व जयश्री पाटील यांच्यात पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मान्य केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. (Jayashree Patil to join BJP)
बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकाचा दणका, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवलं
जयश्री पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. सांगली महापालिकेमध्ये जयश्री पाटील यांचा एक गट आहे. त्यामुळे त्यांचा भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत फायदाच होणार आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
जयश्री पाटील यांचा भाजप पक्षप्रवेश बुधवारी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलंय.