‘स’ चा ‘चं’ झाला अन्…; अजितदादा धीरूभाईंबद्दल नेमकं काय म्हणाले? ज्यामुळे वादाला तोंड फुटलं

‘स’ चा ‘चं’ झाला अन्…; अजितदादा धीरूभाईंबद्दल नेमकं काय म्हणाले? ज्यामुळे वादाला तोंड फुटलं

Ajit Pawar Contervercial statement about Bhirubhai Ambani : सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात अजित पवार (Ajit Pawar) हे देखील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. सभा घेत आहेत. मात्र अशाच एका सभेमध्ये अजित पवारांनी तरूणांना कामाच्या बाबत सल्ला दिला. हा सल्ला देताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी थेट दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याबाबत एक उद्गागार काढले आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अजितदादा धीरूभाईंबद्दल नेमकं काय म्हणाले?

या सभेमध्ये बोलतानना अजित पवार (Ajit Pawar) हे तरूणांना रोजगार नोकरी याबाबत मार्गदर्शन करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, तरूणांनी कोणतही काम करताना त्या कामाची लाज बाळगू नये. पेट्रोल पंपावर काम करून देखील मोठी ध्येय साध्य करता येतात. जसे पेट्रोल पंपावर काम करूनच धीरूभाई अंबानी हे मोठे उद्योजक झाले. मात्र अजित पवार म्हणाले की, मला सहकार टीकवायचा नसता तर मी पेट्रोल पंप काढली नसती. त्या पंपावर गोरगरिबांची मुलं कामं करतात. कारण पंपावर पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणे देखील कमीपणाचं नाही. पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्यातून सोन निर्माण करता आलं पाहिजे.

बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकाचा दणका, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवलं

मात्र अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वादग्रस्त विधानानंतर राजकीय आणि समाजित स्तरावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांना त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ आपल्या एक्स या सोशलमिडीया साईटवर पोस्ट करून टोला लगावला आहे. दमानियांनी या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहिले की, पंपावर पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, MSCB घोटाळा करून आपण काय केलत?, असा टोला दमानियांनी लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube