चंद्रहार पाटलांचा नवा डाव; पण शिंदेंसाठी ‘झुंज’ देतील का?

  • Written By: Published:
चंद्रहार पाटलांचा नवा डाव; पण शिंदेंसाठी ‘झुंज’ देतील का?

Chandrahar Patil joins ShivSena: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये एका जागेवरून जोरदार फाटलं होती. ही जागा होती सांगलीची (Sangli LokSabha).या जागेसाठी शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. जागेवरून महाविकास आघाडीत वादही झाले. तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही जागा पदरात पाडून घेतली. जिल्हा परिषद सदस्य राहिलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले. तिकडे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) अपक्ष रिंगणात उतरले. त्यांनी भाजपचे संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील यांना धोबीपछाड दिली. ठाकरेंचा पहिलवान चंद्रहार पाटलांना केवळ 60 हजार 860 मते मिळाली. त्यांचे डिपॉझिट जप्ट झाले. हे आज आठवणाचे कारण म्हणजेच त्याच चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत. ? सांगलीमध्ये मतब्बर राजकीय नेते आहेत, त्यात चंद्रहार पाटलांना पक्षात घेऊन शिंदेंना काय साध्य करायचंय ? चंद्रहार पाटलांचा काय स्वार्थ आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया…


सोलापूर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? भालके शिंदे गटाच्या वाटेवर, प्रणिती शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान

सांगलीत कुणाची किती ताकद?
सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात महायुतीचे पाच आमदार, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. मिरजचे डॉ. सुरेश खाडे, सांगलीमधील सुधीर गाडगीळ, शिराळामधून सत्यजित देशमुख, जतमधून गोपीचंद पडळकर असे चार भाजपचे आमदार आहेत. तर खानापूरचे सुहास बाबर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत. तासगावमधून रोहित पाटील आणि इस्मामपूरमधून जयंत पाटील हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. तर पलूस-कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम हे काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणजे एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेली सांगली भाजपनेच काबीज केलीय, असे दिसतंय. (Chandrahar Patil joins ShivSena)


अजितदादांनी ताकद वाढविली, एकनाथ शिंदेंचे काय ?

सांगलीमध्ये अजित पवारांना विधानसभेला यश आले नाही. त्यांनी रोहित पाटील, जयंत पाटलांविरुद्ध तगडे उमेदवार देऊन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते फार यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे सांगलीमध्ये ताकद वाढविण्यासाठी अजित पवार यांनी अनेक माजी आमदारांना पक्षात घेऊन ताकद वाढवत आहे. शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठे महांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख, जतचे विलासराव जगताप असे चार माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगलीत आपल्या पक्षाला जनाधार मिळाला पाहिजे. त्यातून चंद्रहार पाटील यांच्यासह अनेक पहिलवानांना त्यांनी पक्षात घेतलंय.

देवेंद्र फडणवीसांची ‘चाणक्य’ नीती, राज ठाकरे मोहरा अन् उद्धव ठाकरेंचा गेम?


चंद्रहार पाटलांना विधानपरिषदेची संधी?

शिंदे गटात येण्यापूर्वी चंद्रहार पाटील यांनी पक्षासमोर काही अटी व शर्तीही ठेवल्या असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी एक अट चंद्रहार पाटलांची आहे. कारण राज्यपाल नियुक्त पाच विधानपरिषदेच्या जागा रिक्त आहेत. त्यातील एक जागा शिंदे गट मागू शकते. तसे झाले तर चंद्रहार पाटील हे विधानपरिषदेवर जातील. क्रीडा संकुलाला निधी मिळावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी द्यावी, अशाही दोन मागण्या आहेत. शिंदेंना सांगलीत पक्षविस्तार करायचा आहे. त्यामुळे त्यांचा मागण्या मान्य केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेतले गेले आहे. सामान्य चेहरा आणि खेळाडू असा दुहेरी फायदा शिंदेंना उचलायचा आहे.


बलाढ्य राजकारणांसमोर चंद्रहार पाटलांचे चालेल का ?

सांगलीमध्ये प्रत्येक मतदारसंघात स्वतःचा मजबूत गट आहे. दुसऱ्याला तिथे स्थान मिळून दिले जात नाही. त्या परिस्थितीत चंद्रहार पाटलांना स्थानिक नेत्यांशी स्पर्धा करून शिंदेंच्या शिवसेनेचा विस्तार करावा लागणार आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये आपल्या सदस्य निवडून आणावे लागणार आहेत. चंद्रहार पाटलांचे मागे तरुणांची फळी आहे हे अनेकदा दिसून आलंय. आता त्यांना त्याचा राजकीय फायदाही उठवावा लागणार आहे.
चंद्रहार पाटलांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्यावर संजय राऊत यांनी एका कोटी केलीय. ते पैलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं आहेत, असे राऊत म्हणालेत. आता एका शिवसेनेकडून दुसरा शिवसेनेकडे आलेले चंद्रहार पाटलांना आपण कच्चं मडकं आहे का पक्क मडकं आहे हे सिद्ध करावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube