Download App

LokSabha Election 2024 : काँग्रेस व आपमध्ये अखेर आघाडी, जागा वाटपही झाले; पण पंजाबामध्ये काय ठरले ?

  • Written By: Last Updated:

AAP-Congress Alliance: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) भाजपला तगडी लढत देण्यासाठी इंडिया (INDIA) आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात जागा वाटपावरून काँग्रेस व आघाडीतील स्थानिक पक्षांमध्ये एकमत होत नाही. त्यातून वादही उफाळून येत आहे. परंतु आप (AAP) व काँग्रेसमध्ये (Congress) मात्र आघाडी होऊन जागा वाटप निश्चित झाले आहे. दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि चंडीगड या ठिकाणी आघाडी झाली असून, जागा वाटपही निश्चित झाले आहे. पण पंजाबचा मात्र जागा वाटप होऊ शकले नाहीत. त्यामुळे पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार आहे, असेही जाहीर करण्यात आले आहे.


नड्डांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला; संजय राऊतांनी डिवचलं

आप आणि काँग्रेस नेते यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेत जागा आघाडी झाल्याचे जाहीर केले आहे. आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले, पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. या पत्रकार परिषदेला आपकडून संदीप पाठ, सौरभ भारद्वाज, आतिशी, तर काँग्रेसकडून दीपक बाबरिया, अरविंदर सिंह लवली आणि मुकुल वासनिक हे उपस्थित होते.

हरियाणात नऊ जागा काँग्रेसला

हरियाणात दहा लोकसभेच्या जागा आहेत. सध्या सर्व जागांवर भाजपचे खासदार आहेत. हरियाणात काँग्रेस नऊ जागा लढणार आहेत. तर आपला कुरुश्रेत्र लोकसभा ही एक जागा देण्यात आली आहे. चंदिगडची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.

अजितदादा अन् रोहित पवारांची बैठक; फोटो ट्विट करत चाकणकर म्हणाल्या, “कामाच्या बाता मारणाऱ्यांना”…


दिल्लीत चार जागा आपला

दिल्लीत सात लोकसभा मतदारसंघ आहेत. नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या चार मतदारसंघही आपला देण्यात आले आहेत. तर एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेला चांदणी चौक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यता आला आहे. तर उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम मतदारसंघही काँग्रेसला मिळाला आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसला दिलासा पण महत्त्वाची जागा आपला
गुजरात विधानसभा निवडणुकीत आपने स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. त्याचा फटका काँग्रेसला चांगलाच बसला. आता मात्र लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये आप दोन मतदारसंघातून लढणार आहे. भरूच आणि भावनगर या दोन्ही जागा आपल्या देण्यात आल्या आहेत. येथून काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले अहमद पटेल यांच्या घरातील व्यक्ती उमेदवारीसाठी इच्छुक होता. या जागेचा पेच निर्माण झाला होता. परंतु ही जागा आपला गेली आहे. गुजरामध्ये 24 जागांवर काँग्रेस उमेदवार देईल. गोव्यात दोन्ही जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत.

https://x.com/AamAadmiParty/status/1761297839429447739?s=20

follow us