Download App

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभेच्या रिंगणात, ‘या’ मतदासंघातून निवडणूक लढणार

  • Written By: Last Updated:

Amritpal Singh will contest Lok Sabha : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता खलिस्तान समर्थक वारिस पंजाब देचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा देखील लोकसभा निवडणूक लढवणार आहे.  सध्या दिब्रुगड तुरुंगात असलेल्या अमृतपाल सिंगच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे.

Lok Sabha elections 2024 : अखिलेश यादव लोकसभेच्या रिंगणात, कन्नौजमधून निवडणूक लढणार 

पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग ३६ दिवसांपासून फरार होता. त्याच्यावर शांतता भंग करणे, हिंसाचार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. अमृतपाल एनएसएच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. दरम्यान, त्याचे वकील माजी खासदार राजदेव सिंग खालसा यांनी अमृतपाल हा खडूर साहिब येथून निवडणूक लढवणार आहे. अमृतपाल अपक्ष लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश आंबेडकर एमआयएमला पाठिंबा देणार? 

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृतपाल सिंग हा खलिस्तानचा समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आहे. अमृतपाल सिंग यांचा जन्म १७ जानेवारी १९९३ रोजी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा येथे झाला. अमृतपाल सिंगच्या वडिलांचे नाव तरसेम सिंग आहे. अमृतपाल अमृतसरमधील जल्लूपूर खेडा येथील रहिवासी आहे. 2012 मध्ये तो दुबईला आपल्या कुटुंबाच्या वाहतूक व्यवसायात सामील होण्यासाठी गेला होता. त्यानंतर 2022 मध्ये तो भारतात परतला.

फेब्रुवारी २०२३ मध्ये अमृतपालने त्याच्या साथीदारांसह पंजाबमधील अजनाला पोलिस स्टेशनवर सशस्त्र हल्ला केला. अपहरण आणि दंगलीतील एका आरोपीला मुक्त करण्यासाठी हे केले गेले होते. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले होते. अमृतपाल यांच्या विरोधात त्याच्याच एका माजी सहकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून अमृतपाल सिंग चर्चेत आहे.

follow us