Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना अर्जना पाटील यांनी माझा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण
महायुतीतर्फे अर्चना पाटील यांनी आज आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेला संबोधित करतांना त्या म्हणाल्या की, धाराशिवची लोकसभा निवडणूक अर्जना पाटील विरूध्द अन्य पक्षाचा उमेदवार अशी नाही. तर ही निवडणूक मोदी विरुध्द राहुल गांधी अशी आहे. मोदींनी चारशे पारचा नारा दिला. त्यांनी त्यांच्या 399 जागा निवडणूक आणण्यासाठी जुगाड लावलं. आता 400 वी मी खासदार मी आहे. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमले आहात की, मला माझा विजय पक्का वाटत आहे, असा विश्वास अर्चना पाटलांनी व्यक्त केला.
माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय आहे? विखेंचा विरोधकांवर घणाघात
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राणा जगजितसिंह, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे उपस्थित होते.
बहिणीसाठी छातीचा कोट करेल – सावंत
तानाजी सावंत म्हणाले की, धाराशिवच्या या जागेवर जानेवारी महिन्यातच प्रचार सुरू झालेला आहे. हा मतदार पारंपारिक पद्धतीने कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे. शिवसेनेचा बाणा या मतदारसंघात आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आला. मात्र, शिवसेनेचा एकेक मतदारसंघ असाच कमी होत राहिला तर हा शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाही, मात्र, विश्वनेते मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्चना पाटलांना मोठ्या मताधिक्याने शिवसैनिक निवडून देतील. हा तानाजी सावंत या बहिणीसाठी छातीचा कोट करेल, असंही सावंत म्हणाले.
दरम्यान, अर्चना पाटील यांच्यासमोर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचं कडवे आहे. मात्र, अर्चना पाटील यांच्यासाठी देखील महायुतीच्या नेत्यांनी जोरदार ताकद लावली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्चना पाटलांच्या प्रचारात कोणहीती कसर सोडली नहाी. त्यामुळं धाराशिवमध्ये अर्चना पाटीलच विजयी होतील, अशी चर्चा सुरू आहे.