Download App

तुमच्या खासदारकीची गॅरंटी आमची, विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी, अन्यथा…; गोगावलेंचा इशारा

  • Written By: Last Updated:

Bharat Gogawale On Sunil Tatkare : रायगड लोकसभा (Raigad Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकर (Sunil Tatkare) यांनी आज आपला उमेदवारी दाखल केला. मात्र, रायगडची जागा अजित पवार गटाकडे गेल्यानं शिंदे गट नाराज होता. अशातच आता शिवसेना नेते भरत गोगावले (Sunil Tatkare यांनी सुनील तटकरे यांना गंभीर इशारा दिला आहे.

मी शारदाबाई पवारांची नात आहे, तुम्हाला काय वाटलं? सुप्रिया सुळे कडाडल्या 

रायगड जागेसाठी शिंदे गट आक्रमक होता. सिंधुदुर्ग-रत्नागिरी असो की रायगड, यापैकी शिवसेनेला एक तरी जागा मिळावी, असा शिंदे गटाचा आग्रह होता. मात्र रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि तिथं खासदार सुनील तटकरेंना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. ही जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी होती. मात्र वरून आदेश आल्याने शिवसेना नेत्यांना सुनील तटकेरेंना मदत करावी लागणार आहे.

Health Tips : शरीरात प्रोटीनची कमतरता, फॉलो करा ‘ह्या’ टिप्स; होणार फायदा 

दरम्यान, आज भरत गोगावलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भरत गोगावले म्हणाले की, सुनील तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आम्ही घेतली, तशीच त्यांनी विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावी, जर त्यांनी विधानसभेला आमची गॅरंटी घेतली नाही, तर आम्ही त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही गोगावलेंनी दिला आहे. शेवटी आम्ही देखील रायगडचे मावळे आहोत, असं गोगावले म्हणाले.

महायुती सरकारमध्ये आपल्याला पालकमंत्री पद मिळेल, अशी आशा गोगावलेंना होती. तशी विधानेही त्यांनी केली होती. मात्र, त्यांना पालकमंत्री पद मिळाले नाही. दरम्यान, आज त्यांना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता भरत गोगावले म्हणाले, आज ना उद्या मी रायगडचा पालकमंत्री होणार आहे, तुम्ही उगाच जन्या खपल्या का काढताय? झालं गेलं विसरून गेलो, राजकारणात अशा गोष्टी होत असतात, असं गोगावले म्हणाले.

 

follow us