Download App

10 वर्षात मोदींनी फक्त उद्योगपतींसाठी सरकार चालवलं; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi on PM Modi : पहिल्या टप्यातातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आज भंडारा-गोंदिया लोकसभेचे (Bhandara-Gondia Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सभा घेतली. साकोलीत झालेल्या प्रचारसभेत बोलतांना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

Raj Thackeray : वसंत मोरेंबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत हात जोडले 

या सभेत बोतलांना राहुल गांधी म्हणाले, कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, मजूर, तरुणांचे प्रश्न आहेत. कामगार, शेतकरी, महिला यांच्याशी करून हा जाहीरनामा बनवला. त्यांना आश्वासने दिली. या जाहीरनाम्यावर कॉंग्रेसचं चिन्ह असलं तरी हा जनतेचा जाहीरनामा आहे.

ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवले, हे मोदींचे सरकार नसून अदानींचे सरकार आहे. जेव्हा पासून मोदीचं सरकार आलं, तेव्हापासून अदानींच्या शेअर प्राईजची किंमत वाढत आहे. अदानी यांचा केवळ विमानतळावरच नव्हे तर देशातील पायाभूत सुविधांमध्येही वाटा आहे. देशातील 22 लोकांकडे देशातील अर्धी संपत्ती आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता आला अडचणीत 

पुजारी नसतानाही मोदी पूजा करतात
ते म्हणाले, मी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत चालत गेलो. यामध्ये मी लोकांना विचारत होतो की सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे? त्यावेळी लोक म्हणायचे की बेरोजगारी, महागाई, हमीभाव हे देशातले मुद्दे आहेत. पण हे गंभीर विषय टीव्हीवर कधीच दिसत नाहीत. तुम्हाला बॉलिवडूचे स्टार टीव्हीवर दिसतात. तुम्हाला मोदी समुद्रात पूजा करताना दिसतील, तिथे पुजारी नसतानाही ते पूजा करतात. नरेंद्र मोदी २४ तास धर्मावर बोलतात. जातींमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने करतात. ते केवळ लोकांचे लक्ष भटकण्यासाठी हे सर्व करत आहे. देशात केवळ थट्टा मांडली जात आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.

सरकार 90 अधिकार चालवतात
नरेंद्र मोदी म्हणतात की मी ओबीसी आहे. मग देशातील सर्वात मोठ्या संस्था किंवा खाजगी संस्थांमध्ये ओबीसींचे प्रतिनिधित्व किती आहे? देशाचे सरकार दिल्लीत बसून 90 अधिकार चालवतात. त्यात ओबीसी आणि मागासवर्गीयांना किती प्रतिनिधित्व आहे? 90 लोकांपैकी तीन नावे ओबीसी, एक दलित, एक मुस्लिम आणि उर्वरित सर्व दुसरे लोक आहेत. मोदींनी ओबीसीसाठी काय केलं, असा सवालही त्यांनी केला.

follow us