Sharad Pawar Attack On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदींच्या राजवटीत हुकुमशाही सुरू असून त्यांनी विकासाची दृष्टी नाही, अशी टीका पवारांनी केली.
‘अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नाही’; भुजबळ गोडसेंच्या उमेदवारी खूश
मोदींकडे दृष्टी नाही…
हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची शिरोळ्यात सभा झाली. या सभेला संबोधित करतांना पवार म्हणाले की, आज या देशात वेगळी परिस्तिथी तयार झाली. या आधी हा देश अनेकांनी चालवला. पंडित नेहरू, लाल बहादुर शास्त्री, गुलजारीलाल नंदा, इंदिरा गांधी, नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनी देश कसा चालवायचा याचा आदर्श घालून दिला. आज प्रश्न खूप आहेत. प्रश्न असतात. पण, ते प्रश्न सोडवण्यासाठी दृष्टी लागते. ती दृष्टी मोदींकडे नाही, अशी टीका पवारांनी केली.
एकही आश्वासन पूर्ण केलं नाही…
पुढं ते म्हणाले, मोदी २०१४ ला सत्तेत आले. सत्तेत येतांना त्यांनी अनेक आश्वासनं दिली. पेट्रोल-सिलेंडरचे दर कमी करू असं सांगितलं. तरुणांना दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी यातील एकही आश्सासन पूर्ण केलं नाही. 2014 मध्ये पेट्रोलचा दर 71 रुपये प्रतिलिटर होता. मोदी 50 दिवसात पेट्रोलचे दर कमी करणार होते. पण, आज पेट्रोलचे दर 106 किंवा 107 रुपये आहेत. 2014 मध्ये सिलिंडरची किंमत 410 रुपये होती. आज तो सिलेंडर 1160 रुपयांवर गेला आहे, असंही पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर…
आज जे चांगले काम करतात त्यांच्या विरोधात सत्तेचा दुरुपयोग केला जातो. आज जे सत्तेत आहेत ते आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत आणि भिन्न राजकीय विचार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहे. सत्तेचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हायला हवा, पण सध्याचे राज्यकर्ते या सत्तेचा गैरवापर करत आहेत, अशी टीका पवारांनी केली.
लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. टीका चुकीची असेल तर तुम्हाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. मात्र, मोदी सरकारवर टीका केल्याने झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. केजरीवाल यांनी दिल्लीत खूप चांगलं काम केलं आहे. मोदींच्या धोरणांना विरोध केल्याने त्यांनाही तरुगांत टाकलं, मोदींच्या राजवटीत हुकुमशाही सुरू आहे, असं पवार म्हणाले.