400 पार सोडा 200 च्या पुढेही जाणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्ला

400 पार सोडा 200 च्या पुढेही जाणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्ला

Aditya Thackeray at Chhatrapati Shahu Maharaj campaign meeting : ऐखाद ऐतिहासीक कुटुंब, नाव ज्यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरतात तेव्हा ती निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी. परंतु, भाजपकडून डरपोक, गद्दाराला उभं केलं असं म्हणत (Aditya Thackeray) आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार घणाघात केला. ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उमेदवार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

 

नकली वाघ पळाले

आम्ही दोन्ही वाघ म्हणजे सतेज पाटील आणि आम्ही सोबत आहोत. वाघ सोबतच फिरतात. परंतु, ज्यांनी वाघाच्या कलरच्या पट्ट्याचे कपडे घातले होते ते नकली वाघ, खोके बहाद्दर, गद्दार पळाले गुहाटीला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सरकाऱ्यांवर जोरदार टीका केली.

 

या राज्यात भाजपला एकही जागा मिळत नाही

आजपर्यंत आपण एका पक्षाची मन की बात ऐकत होतो. परंतु, आता ही परिस्थिती नाही. गद्दारांना आणि भाजपाला मतदान करू नका. 400 सोडा 200 जागाही भाजपच्या येत नाही. तसंच, कर्नाटकमध्ये तर सुमारे 20 जागा कांग्रेसच्या येत आहेत. तसंच, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यात भाजपला एकही जागा मिळते की नाही अशी परिस्थिती आहे, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

 

आमचे मतभेद जरूर होतो

हे सांगातात विरोधकांना मतदान म्हणजे फुकट जाईल. परंतु, तुम्हाला सांगतो भाजपला मतदान म्हणजे मतदान फुकट जाईल असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला मतदान करू नका असं आवाहन यावेळी केलं. तसंच, आमचे आणि काँग्रेसचे राजकीय मतभेत जरूर होते. परंतु, या देशातील संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. कारण जी काम केली ती नेहरुंच्या आणि काँग्रेसच्या काळात झाली. तुम्ही या दहा वर्षात काय केलं? असा प्रश्न विचारून ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला.

 

आमचा पॅटर्न वेगळा

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, आमचा कोल्हापुरकरांचा पॅटर्नच वेगळा आहे. गेल्यावेळी पक्षाने ठरवलं होतं उमेदवार निवडून द्यायचा. परंतु, यावेळी लोकांनी ठरवलं आहे की कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज असतील. तसंच, इथ कोण आलं आणि कुणी सभा घेतल्या याने आमच्या कोल्हापुरकरांना काही फरक पडत नाही, असं म्हणत सतेज पाटील यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube