‘अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नाही’; भुजबळ गोडसेंच्या उमेदवारी खूश

‘अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नाही’; भुजबळ गोडसेंच्या उमेदवारी खूश

Chagan Bhujbal : नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) आम्हाला अपेक्षितच उमदेवार देण्यात आला असून मी अजिबात नाराज नसल्याची पहिली प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटता सुटत नव्हता. नाशिकची जागा शिवसेनेकडे असताना छगन भुजबळांनी या जागेवर दावा केला होता. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या, अखेर हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे खेचूनच आणला असल्याचं बोललं जात आहे. हेमंत गोडसेंची उमदेवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.

मोदींकडून पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख, महायुतीला पडणार महागात?, अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोल

छगन भुजबळ म्हणाले, हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. आम्हालाही अपेक्षा हीच होती. हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरुन मी अजिबात नाराज नसून महायुती म्हणून ताकदीने हेमंत गोडसे यांचा प्रचार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही हेमंत गोडसे यांना लोकसभेत पाठवणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Heeramandi: संजय लीला भन्साळींनी सेटवर अदितीला ठेवलं उपाशी? कारण सांगत ‘बिब्बोजान’ म्हणाली…

तसेच हेमंत गोडसे यांना आता उमेदवारी जाहीर झाली असून उद्या त्यांचा उमेदवार अर्ज भरण्यात येणार आहे. गोडसेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते येण्याची शक्यता आहे. उद्या हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. माझ्या उमेदवारीवरुन समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज असतील पण आम्ही त्यांची समजूत काढणार आहोत. मी खासदार व्हावं अशी इच्छा इथल्या दलित, ओबीसी समाज, अल्पसंख्यांची आहे पण असं झालं म्हणून राजकारण संपलं असं होतं नाही. संधी येतात जातात. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावं लागतं, काही वेळेला अपेक्षा दूर ठेवाव्या लागतात, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

2019 साली आम्ही हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या विरोधात होतो. तेव्हा गोडसेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा होता. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्याच शिवसेनेसोबत आम्ही सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी आमच्यासोबत हेमंत गोडसे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे सर्वच शिवसेनेचे नेते होते. राजकारणात अशा उलाढाली होत असतात, त्यामुळे जुनं सगळं विसरुन आता आम्ही जोमाने कामाला लागणार असल्याचं निर्धार छगन भुजबळांनी केला आहे. दरम्यान, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे रिंगणात उभे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज