नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, याच कंगनाने राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला POK असं संबोधलं होतं. ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, फेम दिला त्याच शहराला कंगनानं अशी उपमा दिल्याने तिच्यावर चहूबाजूनं टिकेची झोड उठवण्यात आली होती. आता याच कंगनाला भाजपनं खासदारकीच्या मैदानात उतरलं आहे. पण, मुंबईची तुलना थेट POK शी करणाऱ्या आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट भिडणाऱ्या कंगनाला भाजपनं उमेदवारी का दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचाच थोडक्यात घेतलेला आढावा… (Why BJP Give Loksabha Ticket To Actress Kangana Ranaut )
राज ठाकरे यांच्यामार्फत शिंदेंना संपविण्याचा डाव, कोणी आखलाय?
‘पंगा’ गर्ल, वाद अन् चर्चा राजकारणातील एन्ट्रीची
वादग्रस्त विधानं भाजपच्या धोरणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे असलेला पाठिंबा यामुळे कंगना राजकारणात येणाच्या चर्चांनी जोर धरण्यास सुरूवात केली. अखेर हिमाचलच्या मंडी मतदार संघातून दिेलेल्या उमेदवारीमुळे या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. कंगनाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिकांमुळे तिला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. मात्र, ती करत असलेली विधानांमुळे तिला ‘पंगा’ गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मध्यंतरी कंगनाच्या मुंबईतील घरावर BMC नं कारवाई केली. यावेळी तिने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चॅलेंज केले होते. कंगनाच्या मुंबईबाबत केलेल्या विधानानंतरच तिच्या मुंबईतील घरावर बीएमसीतर्फे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आल्याचे तिने म्हटले होते. घरावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर बॅकफूटवर जाईल असं माघार घेईल ती कंगला कसली. घरावर झालेल्या कारवाईनंतर कंगना आणखीन आक्रमक झाली अन् तिने एक व्हिडिओ शेअर करत ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असा इशारा देत थेट चॅलेंज दिले.
शिवसेनेत फुट अन् कंगना पुन्हा चर्चेत
कंगनाच्या घरावरील कारवाईनंतर एकीकडे तिला बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातून पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत होती. तर, अनेक स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात होती. हे सर्व सुरू असतानाच दिवस उजाडला तो 21 जून 2021 चा या दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड पुकारतं शिवसेना सुरूंग लावला आणि सेनेचे दोन भाग केले. या बंडखोरीनंतर सर्वांना आठवण झाली ती कंगनाने उद्धव ठाकरेंना म्हटलेल्या अहंकार तुटले या विधानाची.
सलग दोनदा पराभव, तिसऱ्यांदा PM मोदींना देणार टक्कर; वाराणसीच्या मैदानातील अजय राय कोण?
देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं 2014 मध्ये
स्वातंत्र्याबाबत केकेल्या विधानामुळेदेखील कंगनावर टीका करण्यात आली होती. 1947 रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालं होतं असं म्हणत 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सत्तेत आल्यानंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळाल्याचं कंगानानं विधान केले आणि नव्या वादाला तोंड फुटलं. तिच्या या विधानानंतर कंगनाला नेटकऱ्यांना ट्रोल करत चांगलेच फैलावर घेतले होते. अभिनेत सुशांत सिंह, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन यावरही कंगनाने भाष्य केले होते. शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने भाजपची बाजू घेतल्याचे दिसून आले होते. कंगनाचा थेट भिडण्याचा आणि विरोधकांना चितपट करण्याच्या गुणामुळेच तिचा पक्षाला फायदा होऊ शकतो ही बाब हेरत तिला भाजपनं थेट राजकारणाच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता मैदानाबाहेर राहून भिडणारी कंगना आता देशाच्या संसदेतून विरोधकांवर तुटून पडल्यास आश्चर्य वाटायला नको.